आहाराप्रमाणेच निद्रा, झोप हीदेखील सर्व सजीव प्राण्यांमध्ये आढळणारी आवश्यक असणारी गोष्ट आहे. आपल्या आयुष्याचा साधारण एक तृतीयांश कालावधी झोपेत जातो. पण हा वेळ वाया जात नसतो. आपल्या शरीराची, मेंदूची पुनर्बांधणी, दुरुस्ती या काळात होत असते. सर्व सजीव प्राण्यात झोपसदृश स्थिती आढळते. गोगलगायीसारखे प्राणी काही आठवडे निष्क्रिय स्थितीत राहतात. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा हे कळण्यासाठी आता त्याच्या वंशाला जाण्याची आवश्यकता नाही. शास्त्रज्ञ त्याचे संशोधन करीत आहेत. मासे काही काळ पाण्यात निष्क्रियपणे तरंगत राहतात, त्याचवेळी त्यांच्या मेंदूला विश्रांती मिळते. डॉल्फिनच्या मेंदूचा अर्धा भागच एकावेळी विश्रांती घेतो, दोन्ही अर्धगोल आलटून पालटून विश्रांती घेतात. बदकेदेखील झोपताना एका ओळीत येऊन झोपतात. कडेच्या दोन बदकांचा बाहेरचा डोळा झोपेतही उघडा दिसतो आणि त्याला दिसत असते. थोडा वेळ झाल्यानंतर ती आपल्या तोंडाची दिशा बदलतात, पिछेमूड करतात, त्यामुळे त्यांच्या मेंदूच्या दुसऱ्या अर्धगोलाला विश्रांती मिळते. झोपेत शरीरातील बऱ्याचशा स्नायूंना विश्रांती मिळत असली तरी काही स्नायूंना विशेष काम करावे लागते. पक्षांना झोप लागते तेव्हा त्यांच्या पायांच्या नख्यांचे स्नायू घट्ट आवळले जातात, त्यांची पकड घट्ट राहते, डुलकी लागली तरी ते फांदीवरून खाली पडत नाहीत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .