झोपदेखील सवयीची गुलाम आहे. रोज रात्री ठरावीक कृती करून झोपायचे अशी सवय लावता येते. दहा मिनिटे सावकाश चालणे, दात घासणे, अंगाला मसाज करणे, प्रार्थना करणे अशी कोणतीही कृती ठरवता येते. ती कृती झाली की झोप येऊ लागते. प्रत्यक्ष अंथरुणावर पडण्यापूर्वी अर्धा तास अतिशय मंद प्रकाशात राहणे, मंद संगीत ऐकणे, झोप आणायला मदत करते. रात्री दूध प्याले की त्यातील ट्रिप्टोफॅन नावाच्या रसायनामुळे झोप येते. कंटाळा आणि झोप हे प्रोग्रॅम एकाचवेळी चालू शकतात. एखाद्या कंटाळवाण्या पुस्तकाचे वाचन किंवा मनातल्या मनात एकाच शब्दाचे परत परत स्मरण यामुळे झोप लागू शकते. शरीराला पुरेसे श्रम होत नसतील तर झोप लागत नाही किंवा दिवसा झोप पूरी झाल्याने रात्री झोप लागत नाही. अशावेळी झोप येण्यासाठी अधिकाधिक आतुर व्हावे तर ती लाजऱ्या तरुणीसारखी दूर पळते. त्यावर उपाय म्हणजे तिची आळवणी न करणे. अंथरुणातून उठून एखाद काम, लेखन, वाचन पत्र लिहिणे सुरू करावे एखादी रुखरुख, टोचणी मनाला लागून राहिली असेल तेच विचार मनात येत असतील तर ते लिहून काढावेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .