झोपेत काय होते ?


आपण रात्री झोपतो आणि सहा, सात तासांनी जागे होतो, या मधल्या वेळात आपल्या मेंदूत बरेच काही घडून गेलेले असते. झोप लागण्यापूर्वी डोळे जड हातात. आजूबाजूची जाणीव धूसर होते, वास येणे बंद होते. आपण निद्रादेवीच्या राज्यात कधी प्रवेश करतो ते आपले आपल्यालाच समजत नाही. झोपेचे संशोधन आजूबाजूला जागे असणाऱ्या माणसांनाच करावे लागते. मेंदूतील लहरी मोजता येऊ लागल्यानंतर म्हणजेच इईजी काढता येऊ लागल्यानंतर हे संशोधन वेगाने झाले. आपण एखादे काम करीत असतो, पूर्ण जागे असतो त्यावेळी मेंदूत १३ ते २५ फ्रिक्वेन्सीच्या लहरी उठत असतात. आपण डोळे मिटून सुशेगात पडतो, निवांत झालो की त्या लहरींचा वेग मंदावतो. त्या १३ पेक्षा कमी झाल्या की त्यांना अल्फा लहरी म्हणतात. झोप लागत असताना ८ ते १३ या फ्रिक्वेन्सीच्या अल्फा लहरी प्रामुख्याने आढळतात. या काळात बंद डोळ्यासमोर काही चित्रे दिसू शकतात पण ती स्वप्ने नसतात या वेळी हाक मारली तर ती लगेच जाणवते, तंद्री भंग पावते, मेंदूतील लहरी तेरापेक्षा वाढतात, त्या बीटा प्रकारच्या होतात. झोप न लागता आपल्याला जाग येते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Prakash Khanzode

      4 वर्षांपूर्वी

    सुगम आणि सोप्या शब्दांत मांडल्याबद्दल धन्यवाद! पुढच्या भागाविषयी उत्सुक :)



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen