झोप मिळाली नाही तर आरोग्य बिघडते. उंदीर दोन वर्षे जगतात पण त्यांना अजिबात झोपू दिले नाही तर ते दोन आठवड्यात मरतात. माणसांवर असे प्रयोग अर्थातच शक्य नाहीत. पण स्वेच्छेने, अजिबात न झोपता जागे राहण्याचा विक्रम, जागतिक विक्रम अकरा दिवसांचा आहे. निद्रानाशाचा आजार असणारे अनेक जण आपल्याला अनेक महिने झोप लागली नसल्याची तक्रार करतात पण । त्यांना रोज थोडीशी झोप लागत असतेच. शरीरातील रसायनांचे संतुलन राखण्यासाठी जेवढा वेळ झोप आवश्यक आहे तेवढीच ती लागते. झोप आणणाऱ्या गोळ्या । संतुलन कृत्रिमरीत्या बिघडवतात. मेंदूतली झोप आणणारी रसायने वाढवतात, ती । कमी करण्यासाठी झोप लागते. हळूहळू शरीराला या रसायनांची सवय लागते. गोळी । घेतल्याशिवाय झोप लागत नाही. दिवसभरातील आहार, विहार आणि विचार यांच्या । सवयी बदलवूनच झोप नैसर्गिकरीत्या आणण्याचे प्रयत्न आरोग्य राखतात. शरीरमन निरोगी व तरुण ठेवायला मदत करतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Medha Vaidya
4 वर्षांपूर्वीझोपेविषयी बरीच नवीन माहिती मिळाली
निशिकांत tendulkar
4 वर्षांपूर्वीयथेच्छ झोपा!