रात्री उगाचच टाईमपास करीत, टी.व्ही. बघत न राहता लवकर झोपायला हवे. प्रत्यक्ष अंथरुणावर पडण्यापूर्वी अर्धा तास दिवे मंद करायला हवेत. झोपण्यापूर्वी मला पहाटे इतक्या वाजता जाग येईल अशा स्वयंसूचना घेतल्या की गजर होण्यापूर्वी आपोआप जाग येते. अशी जाग येते तेव्हा झोपेचे नैसर्गिक चक्र पूर्ण झालेले असते. रात्री झोपताना घेतलेल्या सूचना हमखास परिणामकारक ठरतात. जाग येईल की नाही अशी चिंता करीत न राहता आत्मविश्वासाने व स्वयंसूचना तंत्रावरील विश्वासाने बिनधास्त झोप लागू शकते. अगदीच काळजी वाटत असेल व त्यामुळे झोप लागत नसेल तर गजरही लावून ठेवावा पण त्यापूर्वीच, गजराची गरज न लागताच आपल्याला उठायचे आहे, असा मनाशी निश्चय केला की जाग येतेच.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .