वयाच्या तीनचार वर्षांपर्यंत बऱ्याच मुलांना रात्री झोपेत 'शू' होते. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत हे प्रमाण कमी होते. तरीही शंभरातील दहापेक्षा जास्त मुले अंथरूण ओले करतात. शंभर मुलांतील सात मुलगे व शंभर मुलीतील तीन मुलींना असा त्रास असतो. सहाव्या वर्षानंतर ही सवय बंद व्हायला हवी. तशी ती झाली नाही तर उपचार करावे लागतात. अन्यथा दहाव्या वर्षांपर्यंत ३% मुलगे व २% मुलीमध्ये ही सवय काम राहते. अगदी क्वचित प्रमाणात ती त्यानंतरही टिकून राहते. मुले अंथरुणात 'शू' मुद्दाम करीत नाहीत पण तरीही त्यांची चेष्टा होते, त्यांना पालकांकडून ओरडून घ्यावे लागत. त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना कायम राहते. त्यांना दुसरीकडे झोपायला जायची लाज वाटते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासावरती दुष्परिणाम होतात, त्यात अडथळे येतात. ते टाळण्यासाठी या सवयीवर उपचार करून घ्यावे लागतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .