सजीव शरीराच्या पोषणासाठी आहार व निद्रा आवश्यक आहेत तर शरीराच्या रक्षणासाठी 'भय' आहे ! भीती वाटते म्हणूनच आपण संकटापासून स्वतःचा बचाव करु शकतो. निसर्गानेच प्राण्यांच्या शरीरात तशी व्यवस्था केलेली आहे. कोणताही धोका आहे याची जाणीव झाली की तत्क्षणी शरीरात अँड्रीनलीन रसायन पाझरते त्यामुळे शरीरात काही बदल होतात. ते युद्धस्थितीत जाते, लढायला किंवा पळायला तयार होते. त्याचवेळी मनात भावना निर्माण होतात, त्यांना आपण राग किंवा भीती म्हणतो. राग व भीती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्राण्यांना या भावना असतात तशाच माणसांनाही असतात. या भावना माणसासहित सर्व प्राण्यांना स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरतात. इतर प्राण्यांना या भावनांमुळे शारीरिक आजार फारसे होत नाहीत, मानवाला होणारे मात्र सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आजार मनातल्या भावनामुळे उद्भवू शकतात. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, अॅसिडिटी, अल्सर, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तोंडातील फोड, दमा, त्वचारोग, डोकेदुखी, मायग्रेन, अंगदुखी, थकवा, अॅलर्जी असे असंख्य आजार मनोकायिक (Psychosomatic) आहेत. मानसिक कारणांमुळे होणारे हे शारीरिक आजार टाळायचे असतील, बरे करायचे असतील तर आपल्याला आपल्या मनातील भय, चिंता, तणाव समजून घ्यावे लागतील, मनाच्या सवयी बदलाव्या लागतील.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Amol Suryawanshi
4 वर्षांपूर्वीExcellent. Working of human mind is explained very nicely