भावनांचा खेळ


भावना माणसात असतात. प्राण्यातही असतात. त्यांचा उगम नैसर्गिक प्रेरणांमधन, नॅचरल इन्स्टिंक्टमुळे होतो. स्वतःचा जीव वाचवणे आणि वंशसातत्य राखणे या महत्त्वाच्या मूलप्रेरणा, धोक्यापासून स्वतःच्या बचाव करणारी यंत्रणा शरीरात असते. धोक्याची जाणीव झाली की प्राण्यांच्या शरीरात बदल होतात. त्या बदलांमुळे संकटापासून त्वरित दूर पळता येते. ही प्रेरणा एकपेशीय अमीबांपासून माणसापर्यंत सर्वांमध्ये असते. अमीबानी भरलेल्या पाण्याच्या बशीत विषारी रसायनाचा सूक्ष्म थेंब टाकला की सर्व अमीबा त्यापासून दूर पळतात. या सहज प्रेरणेलाच माणसाने नाव दिले भीती. भय ही अतिशय आवश्यक भावना आहे. त्यामुळेच जीव जगतो. मांजराचा वास येत असेल तर उंदीर बिळातून बाहेर पडत नाही. माकडे सापाला घाबरतात. हरणे वाघाला तर वाघ आगीला घाबरतो. कोणताही प्राणी भयमुक्त नाही. माणूस हाही एक प्राणीच. तोही निर्भय नाही. भीती त्याच्या जीन्समध्येच कोरलेली. म्हणूनच कोणत्याही संकटाचा अनुभव नसलेली अतिशय लहान बालकेही मोठ्या आवाजाला घाबरतात, रडू लागतात. दचकणे ही भीतीची स्वाभाविक प्रतिक्रिया. शरीरातील अॅड्रीनलीन रसायनाचा स्त्राव वाढतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते, छातीत धडधडू लागते. श्वासाचा वेग वाढतो. स्नायूंकडील रक्तपुरवठा वाढतो, आतड्याकडील कमी होतो. कारण त्या क्षणी पचन महत्त्वाचे नसते, जीव वाचणे महत्त्वाचे. त्यासाठी धोक्यापासून दूर जाणे महत्त्वाचे. वेगाने पळायला हवे. शरीराचे वजन कमी व्हायला हवे. त्यासाठी पाणी बाहेर टाकले जाते. मोठ्या आतड्यात असलेला मल बाहेर टाकला जातो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Prakash Ghatpande

      4 वर्षांपूर्वी

    कामभावनेविषयी लैंगिकता व नैतिकता यांचा परस्पर संबंध हा संवेदनशील प्रश्न निर्माण होतो. तो अर्थात सापेक्ष आहे. मी आंतरजालावर उपक्रम मायबोली, ऐसी अक्षरे मिसळपाव अशा संकेतस्थळांवर 2007 पासून सामाजिक विषयांवर विशेषत:फलज्योतिष विषयावर लिहित आलो आहे. मानवी लैंगिक नाती व निती हा विषय समाजात नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. वरील चर्चापीठांवर आमच्या याही विषयांवर चर्चा होतात. त्यात माझे मित्र धनंजय यांनी लिहिलेला वेश्याव्यवसायाची नैतिकता हा विषय 2008 साली चर्चेला घेतला होता. https://www.misalpav.com/node/1073 हा लेख व त्यावरील चर्चा दोन्ही अतिशय वाचनीय आहे. सामाजिक क्षेत्रातील लोकांनी त्या आवर्जून वाचाव्यात म्हणुन मी लिहित आहे

  2. निशिकांत tendulkar

      4 वर्षांपूर्वी

    अगदी नविन,वेगळी व उपयुक्त माहीती. आभार!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen