निर्वासितांच्या आयुष्याची पुन्हा घडी कशी बसवायची हा आज जगात सर्वाधिक चर्चिला जाणारा प्रश्न आहे. खेळ हे त्यावरचं एक उत्तर कसं ठरतंय याचा वेध घेणारा लेख.
अंक : अनुभव- जानेवारी २०२१
ऑगस्ट २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’’...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .