अंक : अनुभव ऑगस्ट २०२१
दानिश हा पुलित्झर मिळालेला पहिला भारतीय फोटोग्राफर होता. गेल्या शंभरहून अधिक वर्षांमध्ये हा मान कोणत्याही भारतीय फोटोग्राफरला मिळालेला नाही. तो करत होता ते काम अतिशय आव्हानात्मक होतं. त्याची इतर कोणत्याही फोटोग्राफी जॉनरशी तुलना करता येणार नाही. जे काम करताना जीव जाऊ शकतो, त्यापेक्षा आव्हानात्मक काम कोणतं असू शकतं! परंतु हे करत असतानाही दानिशसारखा माणूस माझ्यासारख्या आडगावात राहून, सुखवस्तू आयुष्य जगत काम करणार्या फोटोग्राफरचं कौतुक करायला जराही कचरला नाही.
एखाद्या व्यक्तीचा ‘मित्र’ म्हणून उल्लेख करण्यासाठी नेमके कोणते मापदंड लागतात? तुमची व त्या व्यक्तीची कित्येक वर्षांची ओळख हा मापदंड मैत्री सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडेलच असं नाही. कित्येक वर्षं एकमेकांना ओळखत असूनही दोन व्यक्ती कधी मित्र होऊ शकत नाहीत. तर काही वेळा एखाद्या व्यक्तीशी घट्ट मैत्री होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. दानिश सिद्दिकीचा माझा अनुभव असाच म्हणता येईल. त्या एका अनुभवामुळे दानिशला मी माझा जवळचा मित्र म्हणू शकतो. त्यामुळे हा लेख मी दानिश सिद्दिकी नावाचा एक महान मित्र गमावल्याच्या दुःखातून लिहीत आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
महा अनुभव
, ऑगस्ट २०२१
, व्यक्ती विशेष
, विश्ववेध
व्यक्ती विशेष
SHRIPAD GARGE
4 वर्षांपूर्वीदानिश सिद्दीकी हा देशधर्मापलीकडील होता हे धादांत खोटे वाक्य आहे. तो नक्कीच देशापलीकडील होता कारण त्याला आपल्या देशाबद्दल प्रेम वाटल्याचे कधीही जाणवले नाही. धर्मापलीकडील तो नक्कीच नव्हता. एखाद्या मुस्लिम दंग्यांमध्ये जाऊन त्याने फोटो काढले असतील तर ते आम्हाला दाखवा. त्याला काश्मीर मधील (पंडितांचे जाऊद्या पण) तिथे असूनही मतदानाचा अधिकार नसलेल्या दलितांचे फोटो काढावेसे वाटले होते का? तेथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सैनिकांचे फोटो काढावेसे वाटले का? मुंबई मध्ये हुतात्मा स्मारकाची तोडफोड करणार्यांचे फोटो जे काढतात त्यांना पुलित्झर सारखे पुरस्कार का मिळत नाहीत? यावर आपण सगळ्यांनी विचार करणे आवश्यक आहे.