अंक : महा अनुभव सप्टेंबर २०२१
रस्त्यावर, ट्रॅफिक सिग्नलवर अनेक माणसं छोट्या-मोठ्या वस्तू विकताना दिसतात. सीझन बदलला की त्यांच्याकडच्या वस्तू बदलतात. त्यांचा हा सीझनल व्यवसाय कसा चालतो, त्यांचं घर चालू शकेल-मुलं शिकू शकतील एवढी कमाई होते का?
गेल्या वर्षी आणि याही वर्षी लॉकडाऊन काळात घरातच बसून रहावं लागलं. त्यामुळे उत्पन्न थांबलंच. बचत होती, त्यावर कसंबसं घर चालवलं. त्या काळात खूप त्रास झाला. आता वातावरण थोडं नॉर्मल झाल्यामुळे धंदा पुन्हा वाढेल, असं वाटतं. या कठीण काळात सरकारने आमच्यासारख्या लोकांना आर्थिक मदत करायला हवी. सरकार मदत जाहीर करतं, पण ती कुठे आणि कशी मिळेल हे मला तरी समजलेलं नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
उत्तम लेख.. वेगळा विषय मांडला आहे.. ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे.. सलमा सारखे अनेक श्रमिक दुर्लक्षित आहेत.. फुटपाथवरील चहावाले, स्वप्नं विकणारे लॉटरी विक्रेते, झेंडे विकणारी पोरं, विटा भाजणारे भटकर, घरोघर दुधाच्या पिशव्या टाकणारे दूधवाले, माकडवाले, कुंचिकोरवे, प्लॅस्टिक कचरावेचक, पेपर लाइनवाले, केळीवाली, गायवाली, इडलीवाले, बुकेवाले बंगाली, रथवाले नाथपंथी, चावीवाले, खाजगी सुरक्षारक्षक, कडकलक्ष्मी, मेवाड आईस्क्रीमवाले, स्मशानकर्मी, देवाचे हारकरी, डोंबारी, पिंजारी, वडापाववाले, नंदीबैलवाले भोलानाथ, मालिशवाले, बुटपॉलिशवाले… माझे मित्र संदीप राउत यांनी अशा अनेक लोकांच्या मुलाखती घेऊन एका वेगळ्या विश्वाचा परिचय देणारे “श्रमिकांचे आख्यान” हे पुस्तक लिहिले आहे.. उदा. फुटपाथवरील चहावाले, स्वप्नं विकणारे लॉटरी विक्रेते, झेंडे विकणारी पोरं, विटा भाजणारे भटकर, घरोघर दुधाच्या पिशव्या टाकणारे दूधवाले, माकडवाले, कुंचिकोरवे, प्लॅस्टिक कचरावेचक, पेपर लाइनवाले, गायवाली, इडलीवाले, बुकेवाले बंगाली, रथवाले नाथपंथी, चावीवाले, , कडकलक्ष्मी, मेवाड आईस्क्रीमवाले, स्मशानकर्मी, देवाचे हारकरी, डोंबारी, पिंजारी, नंदीबैलवाले भोलानाथ, मालिशवाले, बुटपॉलिशवाले या पुस्तकाचे परीक्षण महाराष्ट्र टाईम्स मध्ये आले होते. त्याची लिंक पुढे दिली आहे.. https://maharashtratimes.com/editorial/samwad/book-by-sandeep-raut/articleshow/62486080.cms प्रत्येकाने अवश्य वाचावे असे हे “श्रमिकाख्यान” आहे.. या लेखाच्या निमित्ताने हे आठवले...