तारकोव्हस्कीचा  स्टॉकर : श्रद्धेचं काय करायचं?/ चित्रस्मृती


भारतीय-मराठी-प्रेक्षक “स्टॉकर” सारख्या चित्रपटाने कोड्यात पडेल - ‘विज्ञानकथापट’ म्हणून तो समोर येतो, पण  नेहमीच्या विज्ञानकथापट या धर्तीचे त्यात काही नाही. गूढ आणि उकल नाही, भन्नाट वेग नाही, जबरदस्त संघर्ष नाही. कारण विज्ञान आणि साहित्य यांच्याच पायाभूत धरणांची, त्यांच्यातील संघर्षांची आणि फलिताची अनुभूती तार्कोव्हस्की आपल्यापुढे सादर करतो. यामुळे या कलाकृतीचे विश्लेषण म्हणजे आपल्या अनुभूतीचेही विश्लेषण बनते. तारकोव्हस्कीचा  स्टॉकर : श्रद्धेचं काय करायचं? तार्कोव्हस्की या रशियन कलाकाराने जगन्मान्य रशियन सिद्धांताला बाजूला सारून चित्रपटमाध्यमात काव्यात्म निर्मितीची भाषा  कशी सिद्ध करता येईल याचा सतत विचार केला. आकलन आणि भावन यापैकी आकलनाला दुय्यम ठेवून भावाभिव्यक्ती थेट संवेद्य रुपात करण्याची चित्रपटाची भाषा त्याने शोधली आणि विलक्षण ताकदीने आपल्या कलाकृती सादर केल्या. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची ‘एकमेवाद्वितीय’ आविष्कारपद्धती अनेकदा त्याला समजावून सांगावी लागली, पण त्याच्या मुलाखतींमध्ये त्याने वारंवार सांगितले की ‘अर्थबोध’ या बौद्धिक व्यवहाराने चित्रपट बनवण्यात मला स्वारस्य नाही. मानवी भावजीवनाची गुंतागुंत, त्यातील तिढे, अनेकपदरी बंध व्यक्त करणारी दृक्श्राव्य प्रतिमा हाच त्याचा मूलघटक होता. कल्पिताला, आंतरिक मानसिक व्यवहारांना ज्या संगती – किंवा असंगती/विसंगती असतात, जे पीळ आणि उलगडे त्याच पातळीवर होतात, ते साक्षात रंगवणे यात त्याची प्रतिभा व्यस्त आणि व्यग्र होती. आविष्काराशी मुळातून जोडलेले दु:ख, वेदना यांचा अनुभव मांडत राहणे हेच त्याने केले. त्याच्या निर्मितीला सोव्हिएत रशियातील व्यवस्था हा एक प्रमुख नियामक आणि संदर्भ होता. माध्यमविषयक मुळातूनच अशी भूमिका ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      3 वर्षांपूर्वी

    तारकोव्हस्कीचा स्टॉकर : श्रद्धेचं काय करायचं? १९७९ सालचा हा सिनेमा.. कधीतरी अर्धवट पाहिलेला.. संथ आणि कंटाळवाणा... एखादा चित्रपट डोक्यावरून जातो... समजू शकतो... पण परीक्षण वाचूनही काही कळत नाही म्हणजे हद्दच झाली...वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen