पेट सेमेटरी - अभिजात तरीही आधुनिक 


मला जुन्या फिल्ममधलं फार काही आठवत नाही, पण ती फार ग्रेट नव्हती हे माझं मत बदलणार नाही हे कळण्याइतपत आठवते. तरीही त्यातलालुईस क्रीडच्या दोन तीन वर्ष वयाच्या मुलाचा हमरस्त्यावर होणारा मृत्यू मात्र माझ्या डोक्यात घट्ट बसलेला आहे. नव्या पेट सेमेटरीच्या  ट्रेलरवरुनहीहे लक्षात येतं, की क्रीड कुटुंबातल्या दोन मुलांपैकी मरणारी व्यक्ती या रुपांतरात बदललेली आहे. पेट सेमेटरी - अभिजात तरीही आधुनिक   - गणेश मतकरी मुळात ‘पेट सेमेटरी’ वाचल्याची ( आणि पाहिल्याचीही ) माझी आठवण फार जुनी आहे. किंग ज्यांना ‘ काॅन्स्टन्ट रीडर’ म्हणतो, म्हणजे त्यानेलिहिलेलं सगळंच्या सगळं जे वाचतात, त्यातला मी आहे, आणि त्यामुळे त्याच्या साहित्याच्या प्रचंड ढिगात कधीतरी मधेच ते वाचलं गेलेलं आहे.फिल्म १९८९ ची , म्हणजे तीस वर्ष जुनी आहे आणि ती मी बहुधा १९९१/९२ च्या सुमाराला व्हिसीआर वर पाहिली असावी. दोन्हीबद्दल माझं मतफारसं ग्रेट नव्हतं. पण दोन गोष्टींमुळे ही कादंबरी मी पुन्हा वाचायचं ठरवलं. पहिली म्हणजे त्याचा रिमेक येतो आहे, ही घोषणा, आणि दुसरी म्हणजेही किंगच्या दृष्टीने त्याची सर्वात भीतीदायक कादंबरी असल्याची ( त्याच्या दृष्टीकोनातून ) त्याने दिलेली कबूली जी पुस्तकाच्या प्रस्तावनेतही आहे.त्यामुळे ही कादंबरी मी नुकतीच पुन्हा वाचली आणि तिच्याबद्दलचं माझं मूळ मत पूर्णपणे बदललं. एक गोष्ट उघड आहे आणि किंगने स्वत:नेही अप्रत्यक्ष रितीने ती सूचीत केलीय, आणि ती म्हणजे ही कादंबरी डब्ल्यू डब्ल्यू जेकब्स यांच्या ‘दमन्कीज पाॅ’ या अत्यंत लोकप्रिय गोष्टीचं काही प्रमाणात रिवर्कींग आहे. त्यात वर्णन केलेल्या घटनांच्या जवळ जाणाऱ्या काही घटना आपल्याआयुष्यात घडल्याचं आणि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

 1. akashvthele

    2 वर्षांपूर्वी

  लवकरच बघेन पण चित्रपट बघण्याआधी पुस्तक वाचू की नंतर, की नाही वाचलं तरी चालेल (वाचायची इच्छा आहे!)?

 2. Ajitdixit

    2 वर्षांपूर्वी

  Can you please check formatting
  Not able to read

 3.   2 वर्षांपूर्वी

  आधळयचे डोळे ह्या पुस्तकाविषयी काही लेख असतील तर वाचायचे आहेतवाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.