राज्य सरकार तर्फे देण्यात येणारे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे आहेत. प्रादेशिक चित्रपटांना पुरस्कार देऊन चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे हे श्रेय जातं. राऊंडअप ५६ वा महाराष्ट्र चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली गेली आणि लगेचच त्यावर उलट सुलट चर्चा ही सुरु झाली. यंदा अंतिम यादीत 'दिठी', 'भोंगा' ,'आणि डॉ.काशिनाथ घाणेकर', 'फायरब्रँड', 'बंदिशाळा', 'आम्ही दोघी', 'एक सांगायचयं', 'तेंडल्या', 'भुर्जी' आणि 'चुंबक' या चित्रपटांचा समावेश आहे. 'नाळ', 'गुलाबजाम', 'न्यूड', 'पाणी' या बहुचर्चित चित्रपटांचा समावेश अंतिम दहा चित्रपटांच्या यादीत नसल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत ! राज्य सरकार तर्फे देण्यात येणारे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे आहेत. प्रादेशिक चित्रपटांना पुरस्कार देऊन चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे हे श्रेय जातं. मराठी चित्रपट निर्मिती करणारे निर्माता-दिग्दर्शक यांच्या बरोबरीनेच कलावंत, तंत्रज्ञ यांना रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची ही परंपरा गेली ५६ वर्षे सुरु आहे. सत्तर ऐंशीच्या दशकात वर्षाला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट निर्माण होत असताना देखील वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने अनेक ब दर्जाच्या चित्रपटांना राज्यशासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांमुळे आणि त्यानंतर सुरु झालेल्या अनुदान योजनांमुळे मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारला नाही ही वस्तुस्थिती आहे. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
राज्य पुरस्कार घोषणा आणि वाद
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-04-16 10:00:36