सध्या आपल्याकडे चरित्रपटांची लाट आलेली आहे. चरित्रपट म्हणजे माहितीपट नव्हेत हे जितके खरे तसचं त्यात इतिहासाचा आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांचा विपर्यास केला जाऊ नये. हे देखील भान दिग्दर्शकाने बाळगायला हवं. या पार्श्वभूमीवर निळू दामले यांनी ब्रिटनचे पंतप्रधान चर्चित यांच्यावर आधारित निर्माण झालेल्या कलाकृतीचा घेतलेला हा लेखाजोखा! २०१७ सालात विन्स्टन चर्चिल यांच्यावर तीन चित्रपट झाले. ' डंकर्क ', ' चर्चिल ', ' डार्केस्ट आवर '. पैकी ' डार्केस्ट अवर 'ला ऑस्करची सहा नामांकनं आहेत. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्टअभिनय, उत्कृष्ट रंगभूषा इत्यादी.विन्स्टन चर्चिल. यूकेचे पंतप्रधान. नोबेल पारितोषिक विजेते. चित्रकार. लेखक. नौदल अधिकारी. पत्रकार. भाषाजाणकार. इंग्रजीचा अर्धा शब्दकोष त्यांना पाठ होता असं म्हणत. डार्केस्ट आवरमधेच एक राजकारणी म्हणतो " “He mobilized the English language and sent it into battle.” बीबीसीनं केलेल्या एका पहाणीत लोकांनी त्यांना ब्रीटनमधला सर्वात ग्रेट ब्रिटीश नागरीक ठरवलं.चर्चिल हे सरळ गृहस्थ नव्हते. त्यांनी स्वतःच्या वर्तनानं अनंत वादांना जन्म दिले. फटकळ होते, केव्हां काय बोलतील ते सांगता येत नसे. टीका आणि प्रशंसा दोन्ही बाबतीत त्यांची जीभ सैल असे. राजकारणी माणूस. सत्ता हाती रहावी, पंतप्रधानपद हाती रहावं यासाठी नाना तडजोडी, भानगडी. इंग्रजी साम्राज्याचे घट्ट पुरस्कर्ते. भारत स्वातंत्र्य मिळायच्या लायकीचा नाही असं म्हणत. गांधीजीना नंगा फकीर
हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘रुपवाणी’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘रुपवाणी’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. -->
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
चरित्र आणि चित्रपट / दीवार '१००' आठवडे
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-04-18 10:00:09

वाचण्यासारखे अजून काही ...

छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास
शं.गो.चट्टे | 2 दिवसांपूर्वी
आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते.
कलाकार प्राणी
सुबोध जावडेकर | 3 दिवसांपूर्वी
तुम्ही कुंभारमाशीचं घर पहिलं आहे का? ते काहीसं भुईमुगाच्या शेंगेसारखं दिसतं, आकारानेही ते शेंगेएवढंच असतं. आणि त्याचा रंगसुद्धा शेंगेसारखाच पिवळसर तपकिरी असतो. या ओस्मिया माशीचं घर आकाराने जरी आपल्याकडच्या कुंभारमाशीसारखं असलं तरी त्याचा रंग मात्र आपल्या कुंभारमाशीच्या घरासारखा मातकट नसतो. फार फार सुंदर असतो. लाल, जांभळा, गुलाबी, पिवळा, निळा अशा अनेक रंगांनी ते सजलेलं असतं! एखाद्या रंगीबेरंगी फुलांचा ताटवा असावा तसं. कारण ते मुळी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांपासूनच बनवलेलं असतं.
शब्दांच्या पाऊलखुणा - चित्रपटाला प्रेक्षकांंची मुरकंड (भाग - २१)
साधना गोरे | 4 दिवसांपूर्वी
मुर-मुरका-मुरकत-मुरकंड या शब्दांचा सोदाहरण घेतलेला आढावा
श्री. पु. आणि राम पटवर्धन
अनंत देशमुख | 5 दिवसांपूर्वी
राम पटवर्धन यांच्याविषयी श्री. पुं.नी ‘अभिन्नजीव सहकारी’ असं म्हटलं त्यात सारं आलंच.
नव्याजुन्यांचा कलह
प्रो. गोविंद चिमणाजी भाटे | 5 दिवसांपूर्वी
आपल्या मराठेशाईंत इतके मुत्सद्दी व धोरणी पुरुष झाले, पण त्यांच्या भरभराटीच्या काळांत सुद्धा या इंग्रजांच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांची स्थिती निरीक्षण करण्याचे कोणाच्याही कसे मनांत आले नाही?