‘कलंक’ पारंपरिक ‘धर्मा’ सिनेमा नाही. मात्र संजय लीला भन्साळीचा प्रभाव या सिनेमात नक्कीच जाणवतो. प्रभाव जाणवत असला तरी कलात्मक किंवा मनोरंजनात्मक दृष्ट्या दिग्दर्शक अभिषेक वर्मनला कलंकमधून भन्साळी चा दर्जा गाठता आलेला नाही. सौम्यपणाचा ‘कलंक’ मिरवणारा ‘कलंक’! करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सची एक प्रतिमा अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात कायम होती, ज्यानुसार धर्माच्या फिल्म्स या मोठ्यांची छोटी दुखणी अश्या प्रकारात मोडणाऱ्या असायच्या. मात्र आता धर्मा प्रोडक्शनची व्याप्ती इतकी वाढली आहे की त्यांना एक कुठली प्रतिमा अबाधित ठेवणं अशक्य आहे. एकीकडे धर्मा बाहुबली आणि २.० सारख्या फिल्म्स बरोबर जोडलं जातंय तर सोबतच सिम्बा सारख्या फिल्मच्या निर्मितीत ही त्यांचा सहभाग असतो. हे सगळं मांडायचं कारण हेच की ‘कलंक’ सुद्धा पारंपरिक ‘धर्मा’ सिनेमा नाही. मात्र संजय लीला भन्साळी या सिनेमाकाराचा प्रभाव या सिनेमात नक्कीच जाणवतो. प्रभाव जाणवत असला तरी कलात्मक किंवा मनोरंजनात्मक दृष्ट्या दिग्दर्शक अभिषेक वर्मनला कलंकमधून भन्साळी चा दर्जा गाठता आलेला नाही. एखाद्या तर्रेदार मटण करीला पाणी टाकून पातळ करावे आणि त्याची चव निघूनच जावी असा प्रकार इथे घडला आहे. कलंकचं काही अंशी कौतुक झालं ते त्यातल्या भव्य नेपथ्यासाठी. मात्र हे नेपथ्य खोटं खोटं वाटत राहतं. वास्तवाशी त्याचा संबंध असावा असा आमचा हट्ट नाही, पण त्यात एक जिवंतपणा अपेक्षित असतो. खरंच एक वेगळं जग इथे अस्तित्वात आहे अशी अनुभूती अपेक्षित असते, जी आपल्याला भन्साळ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .