एंडगेम इज हिअर


कुठल्याही किमतीवर एंडगेम पाहायचाच हे ठरवून बसलेले डेसपरेट लोक 2000 रुपयाची तिकिटं घ्यायलाही तयार झाले. भारतात हॉलीवूड चित्रपटासाठीची अशी क्रेझ मी आजवर पाहिली नव्हती.  

एंडगेम इज हिअर

                  गेल्या दोनेक दिवसांत सोशल मीडियावर लोकसभा निवडणूकीला मागे टाकून अँव्हेंजर्स एंडगेमचं अॅडव्हान्स बुकिंग हा हॉट टॉपिक बनलाय. भारतात शनिवारी-रविवारी बुक माय शोवर एंडगेमची बुकिंग ओपन होताच दहा वीस मिनिटातच पहिला दिवस सोल्ड आऊट झाला. नंतर दोनेक तासातच पहिल्या पाच दिवसांचं बुकिंगही हाऊसफुल झालं. काही लोकांनी चक्क तिकिटांचा काळाबाजार सुरू केला. स्वतःजवळची तिकिटं ते चढ्या भावात विकू लागले. कुठल्याही किमतीवर एंडगेम पाहायचाच हे ठरवून बसलेले डेसपरेट लोक 2000 रुपयाची तिकिटं घ्यायलाही तयार झाले. भारतात हॉलीवूड चित्रपटासाठीची अशी क्रेझ मी आजवर पाहिली नव्हती. म्हणजे फास्ट अँड फ्युरियस 7, जंगल बुक वगैरे चित्रपटांनी बक्कळ आर्थिक कमाई नक्की केली आहे, पण हा अॅडव्हान्स बुकिंगचा मामला तर ट्रेड विश्लेषकांचं डोकं चक्रावून टाकेल इतका विचित्र आहे. अर्थात यात स्टेटस सिम्बॉलसाठी फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट मिळवण्याचा भाग बराच असला तरी भारतात MCU ची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे हे नाकारताच येणार नाही. ज्यांना MCU बद्दल अक्षरशः काहीही माहिती नाही अशा लोकांनाही या क्रेझने झपाटून टाकलंय. गेल्या अकरा वर्षांत मार्व्हल स्टुडिओने MCU या मल्टीबिलियन फ्रँचाईजला आकार देऊन कॉमिकबुक फॅन्सना प्रचं ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. Ganesh Matkari

      3 वर्षांपूर्वी

    DC ने केलय ना चालू. कॅरेक्टर फिल्म्स करुन आता ॲव्हेंजर्ससारख्या जस्टीस लीग फिल्म बनवतात. पण त्यांच्या एफर्टमधे कन्सल्टन्सी नाही.

  2. akashvthele

      3 वर्षांपूर्वी

    DC वाले कधी त्यांच यूनिवर्स वसवून अशी फ्रैंचाइज़ आणनार आहेत काय माहिती? तरी त्यांचा Joker आणि Birds of Pray वर बरीच आशा ठेवून आहे!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen