ऋतुपर्णो घोषला आठवताना / चित्रस्मृती


अभिजात बंगाली चित्रपटांचा वारसा जपणा-या ऋतुपर्णो घोष या प्रतिभावान दिग्दर्शकाचा ३० मे २०१३ ला अकाली अंत झाला. त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा संतोष पाठारे यांनी घेतलेला वेध   तो एक मनस्वी कलावंत होता. जिवंतपणीच तो एक दंतकथा बनून राहिला होता. त्याच्या अकाली मृत्यूने अवघं कलाविश्व हळहळलं, ज्याच्याकडून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण होण्याच्या आशा होत्या त्याच्या अचानक एक्झिट घेण्याने चित्रपट रसिकांना धक्का बसला. केवळ आपल्या चित्रपटांतूनच नव्हे तर वागण्या बोलण्यातून, वैचारिक अभिव्यक्ति मधून त्याने जे धक्के दिले ते सहजा सहजी सहन करण्या एवढी प्रगल्भता आपल्या समाजाला नाही याची जाणीव असताना देखील तो बेधडक आयुष्य जगला आणि त्याच हट्टापोटी मृत्यूलाही सामोरा गेला. ऋतुपर्णो घोष, व्यक्ति आणि कलावंत म्हणुनही समजायला अवघड होता. त्याचे चित्रपट वरकरणी सोपे वाटले तरी जीवनाची व्यमिश्रता त्यामध्ये पुरेपूर होती. दिग्दर्शक म्हणून त्याच्या चित्रपटांची जेवढी चर्चा झाली तेवढीच किंबहुना थोडी अधिक चर्चा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केली गेली. चित्रपट दिग्दर्शकाच्या नजरेतून पहायचा असतो पण त्यात दिग्दर्शकाच्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ शोधायचे नसतात, काहीवेळेस तसे संदर्भ आढळले तरीही त्यावरुन त्या दिग्दर्शकाच्या खाजगी आयुष्याचं मूल्यमापन करायचं नसतं हे नियम आपल्याकडे पुरते उमगलेलेच नाहीत. त्यामुळेच की काय ऋतुपर्णोचे चित्रपट पाहताना हे संदर्भ शोधायची सवय अनेकांना जडली. ऋतुपर्णोने देखील स्वतः आपलं वैयक्तिक आयुष्य कधीही लपवून ठेवलं ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. asmitaphadke

      3 वर्षांपूर्वी

    nice article !वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen