प्रॉपर्टी टॅक्स च्या निमित्ताने अलीकडेच नाज़ बिल्डिंग चर्चेत आली, त्यानिमित्ताने भूतकाळातील रम्य आठवणींना श्री.अरुण पुराणिकांनी दिलेला उजाळा.. प्रॉपर्टी टॅक्स च्या निमित्ताने अलीकडेच नाज़ बिल्डिंग चर्चेत आली आणि भूतकाळातील रम्य आठवणींना उजाळा मिळाला गिरगाव रोड, त्रिभुवन रोड लैमिंग्टन रोड,सैंड्हर्स्ट रोड या मधल्या पट्ट्यातील जागा एका ब्रिटिश धनिकाची होती १९०४ मध्ये ही सर्व जागा सर मंगलदास, (ज्यांच्या नावे काळबादेवीला मंगलदास कापड बाजार आहे ते ) यांच्या नावे करुन तो मालक इंग्लैंड मधे स्थाईक झाला ती प्रॉपर्टी मंगलदास वाड़ी म्हणून प्रसिद्ध आहे पुढे या प्रोपर्टीची वाटणी होऊन तिचे वेगवेगळे तुकडे पडले व नविन मालक आलें त्या जागेवर कोरोनेशन (१९०८) व ओलम्पिया ही मनोरंजनाची थिएटर्स उभी राहिली दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या मूकपटाचे प्रसिद्धिपूर्व प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी ओलम्पिया या पॉश थिएटर मधे झाले या जागेवर पुढे सुनीति हायस्कूल उभे राहिले अलीकडचा मोकळा भूखंड महाजनानी घेतला व तिथे १९०४ मधे माधवाश्रम हॉटेल सुरु केले. याच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत बैठे कौलारु कोरोनेशन थिएटर होते. ३ मे २०१३ पासून इथे राजा हरिश्चंद्र चे सामान्य जनतेसाठी तिकीट लावून नियमित खेळ होउ लागले. १९१५ च्या दरम्यान कोरोनेशन थिएटर पाडण्यात आले व तिथे वेस्ट एन्ड थिएटर उभे राहिले पूर्वी इथे यायला फ़क्त पारेख स्ट्रीट गिरगाव वरून रस्ता होता वेस्ट एन्ड मधे येण्यासाठी लेमिंग्टन रोड वरुन ही रस्ता करण्यात आला. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
asmitaphadke
6 वर्षांपूर्वीNostalgic !!