एकपडदा चित्रपटगृहे काळाच्या रेट्यामुले धडाधड बंद पडत आहेत आणि आता प्रक्रिया थोपविता येणारही नाही. परंतु एकेकाळी याच चित्रपटगृहांनी चित्रपटांची रंगीत अनोखी दुनिया दाखवली, आपलं बालपण, तारूण्य घडवलं-बिघडवलं. त्या स्मृतींना अर्पण केलेला कथालेखक, अनुवादक आणि चित्रपटप्रेमी मधुकर धर्मापुरीकर यांचा हा लेख- ............................................................................. गुलाबी तिकिटाची गुंडाळी आणि बिड्यांचा, धुराचा वास... पुनवेच्या चंद्राचा अर्थ माहित नव्हता, तेव्हा ‘चौदहवी का चांद’ पाहिला होता, तो आईसोबत. थिएटरमध्ये त्यावेळी ‘जनाना क्लास’ असायचा. मागच्या बाजूला भिंत टाकून एक बाजू जनाना क्लासची, तर एक बाजू खुर्च्यांच्या क्लासची; पुरूषांची. सिनेमा सुरू झाला, की कुणी बाई धुणे वाळत घालताना जावी, तशी दोरीवरून सर्रकन पडदा ओढायची. डोळ्यांसमोर दिसायचं ते प्रकाशमान जग, बस्स काही नाही. पुढे, शाळा बुडवून सिनेमाला जायचे दिवस आले, त्यावेळी त्या प्रकाशाच्या पडद्यासमोर फरशीवर मांडी घालून सिनेमा बघायची सवय. एक मित्र होता, तो हातात पुस्तक घेऊन यायचा आमच्यासोबत. फरशीवर बसायचा नाही, तो बसायचा एक्झिटच्या दाराच्या पायरीवर, नाहीतर बंद खिडकीत. सिनेमा सुरू व्हायच्या आधी लाईट असायचे, त्या लाईटमध्ये त्याचा ‘आभ्यास’चालायचा- विक्षिप्तासारखा चेहरा करून वाचायचा, आम्ही किंचाळणार्या गाण्यांसारखे दाटीवाटीने बसलेले. पुढे, त्याच फरशीच्या क्लासमध्ये बाकं आली. नवीन सिनेमाची ती झुंबड. पावसापाण्याला-उन्हाला न जुमानणारी, या गर्दीत चेमदून गेलो. गच्च मुठीत गुलाबी तिकीटाची गुंडाळी डोअर किपरच्या हवाली केली, की जिंकलेल्या चेहर्याने धडाधड बाकं गाठायचे, जागा गाठायच्या. असा सिनेमा सुटल्यावर परतताना डोक्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
asmitaphadke
6 वर्षांपूर्वीNice article !