चित्रस्मृती/ अमिताभचा लोकसभेतील पहिला दिवस......


अमिताभचा लोकसभेतील पहिला दिवस...... चित्रपट कलाकारांनी राजकारणात यशस्वी व्हावे, इतकेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकीत विजयी होणे हे आता नवीन राहिलेय नाही. यावेळी तर हेमा मालिनी, सनी देवल, मनोज तिवारी, किरण खेर, बाबुल सुप्रियो, स्मृती ईराणी, रविकिशन, अमोल कोल्हे,नवनीत राणा, हंसराज हंस, नूसरत जहां, मिमी चक्रवर्ती, देव ( दीपक अधिकारी) ,सुमालता ( कन्नड अभिनेत्री) असे चक्क चौदा फिल्मवाले देशातील विविध भागात आणि विविध राजकीय पक्षांतून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. पण जेव्हा महानायक अमिताभ बच्चन निवडणूकीत विजयी झाला आणि त्याने लोकसभेत पहिले पाऊल टाकले तेव्हा.... आपले फिल्मी करियर अतिशय उत्तम चालले असतानाच आपले मित्र राजीव गांधी यांना मदत करणे या हेतूने अमिताभने १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील इलाहाबाद मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांच्यासारख्या अतिशय कसलेल्या, मुरब्बी, मुत्सद्दी राजकीय नेत्याविरुध्द उमेदवारी स्वीकारली आणि अख्खी चित्रपटसृष्टी, मिडिया आणि फिल्म दीवाने आश्चर्यचकित झाले. तोपर्यंत सत्तेच्या राजकारणात दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक सहभागी होतात आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील वरिष्ठ कलाकारांची राज्यसभेचे खासदार म्हणून स्वीकारले जातात ( उदाहरण म्हणजे पृथ्वीराज कपूर, नर्गिस) असा सर्वसामान्य समज होता. पण अमिताभ, वैजयंतीमाला आणि सुनील दत असे एकाच निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकार खासदार हे नवीन वळण आले. प्रत्येक निवडणुकीत 'नवा खासदार ' हे खास वैशिष्ट्य असते. किमान वीस टक्के खासदार नवीन असतात. त्यातील काहींच्या बाबतीत विशेष कुतूहल असते. त्यावेळी अमिताभबद्दल तसेच कुतूहल होते. आणि त् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.