चॉपस्टिक्स - वेगळा विचार


चॉपस्टिक्स - वेगळा विचार सुहास किर्लोस्कर चॉपस्टिक्स म्हणजे काय? नूडल्स खाताना सारख्या लांबीच्या दोन स्टिक्स (काठ्या असे भाषांतर करता येणार नाही). हाताने खाण्याची सवय असलेले आपण पहिल्यांदा काटा चमचा वापरण्याची वेळ येते तेव्हा काय करतो? आपण हातानेच खाणे कसे योग्य आहे यावर प्रवचन देतो. हाताने खाण्यात गैर काहीच नाही पण आपली स्वतःला बदलण्याची आणि नवीन काय शिकायची तयारी नसते. चॉपस्टिक्स वापरून नूडल्स खाणे हे अजून एक दिव्य. दोन स्टिक्स मध्ये नूडल्स पकडायच्या कशा? ते एक तंत्र आहे जे आपण कधी शिकत नाही. प्रवासाला महाराष्ट्राबाहेर गेलो उदा. हिमाचल मध्ये गेलो तर तिथेही कांदेपोहे आणि बटाटावडा आहे का हे विचारतो. केनियाच्या जंगलात गेलो तर तिथेही आमटी आहे का हे विचारतो. (पोर्तुगाल-अंटार्टीकामध्ये सुद्धा पुरणपोळ्या देणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्या आहेत पण तो आपल्याला पागल बनवण्याचा प्रकार झाला. ) दक्षिण भारतातली मंडळी जाऊ तिथे इडली सांबार आणि डोशाचे प्रकार मागतात. हे प्रकार दक्षिण आफ्रिकेत मिळाले नाही तर त्यांच्या दृष्टीने या देशात काही अर्थ नाही. जेथे दर्जेदार कॉफीचे उत्पादन होते तेथें सकाळी सकाळी आपल्याला चहा कसा "लागतो" यावर लेक्चर देत असतो आपण. असे का होते? कारण आपण स्वतःला बदलायला तयार नसतो, नवीन काही शिकण्याची तयारी नसते. https://youtu.be/dxbCuuc-jp4 चॉपस्टिक्स हा नेटफ्लिक्सवर आलेला नवा सिनेमा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याबद्दल आहे. यातला आर्टिस्ट हेच नाव असलेला नायक म्हणतो "आता काय करायचे असा प्रश्न पडला तरी त्या प्रश्नावर 2 मार्ग असतात. एकच मार्ग आहे असे वाटले तरी दुसरा एखादा रस्ता असतोच." तो असेच अतरंगी पर्याय सुचवत असतो, स्वतः unconventionally राहणारा असतो. नायिकेचे नाव निरमा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen