त्रुटी असूनही भावनिक नातं जोडणारा 'भारत' अभय साळवी भाई म्हणजे टुकार, भाईचा सिनेमा त्याहून टुकार, आणि सिनेमा प्रदर्शित झाला रे झाला की सिनेमा न पाहताच त्यावर सोशल मीडियाने भरभरून तोंडसुख घ्यायचं! हे नेहमी ठरलेलं असल्याप्रमाणे यावेळीही सलमान भाईचा 'भारत' प्रदर्शित झाल्यावर अगदी तंतोतंत तसंच घडलं. सिनेमा पाहूनही तो अनेकांना आवडला नाही हे ही खरंच, मात्र त्या मताला मान्य करता येतं. ते मत किती परिपक्वरित्या पूर्वग्रहदूषित न असता तयार झालंय हा भाग वेगळा. कुठल्याही फिल्म चा ट्रेलर हा मुख्यतः एकाच कारणासाठी असतो. ते कारण म्हणजे प्रेक्षकांना एकूण सिनेमा कसा असेल या बद्दल जुजबी ओळख करून देणे. हा ट्रेलर पाहून काही चांगल्या-वाईट अशा अपेक्षा प्रेक्षकांच्या मनात तयार होतात. किंबहुना सिनेमा कुठल्या बाजाचा असेल त्यात साधारण कुठले कुठले जॉनर चे घटक आढळतील या बद्दल सीमित तरीही ठोस अशी कल्पना प्रेक्षकांना येते. तेव्हा एखादा सिनेमा पाहायला गेल्यावर जर त्या ट्रेलर नुसारच (बरा-वाईट हा वेगळा मुद्दा) प्रामाणिक तो सिनेमा निघाला की आपण फसवले गेलेलो नाही हे लक्षात येतं. 'भारत' अशाच प्रकारे प्रामाणिकपणे जाहिरात केलेला सिनेमा आहे असं मला वाटतं. त्यातली गाणी, प्रोमोज आणि अर्थात ट्रेलर या सर्वातून जी काही या सिनेमाची प्रतिमा आपल्या मनात तयार होते त्या प्रतिमेच्या अगदी जवळचाच हा सिनेमा आहे. सिनेमाची सुरुवात: एक ७० वर्षीय माणूस गर्दीत चालतोय, लगेच मागून नरेशन येतं की बघा हा माणूस, याच्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? हा कसं आयुष्य जगला असेल? वगैरे वगैरे..आणि लगेच मग त्या माणसाची लहानपणापासूनची गोष्ट पडद्यावर अवतरु लागते. फरक इतकाच की हा माणूस फक्त एक व्यक्ती म्हणून आपल्या समोर आणलेला नाही, याचं ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .