सिनेमातला अंधार आणि फिल्म संपल्यावर थिएटरबाहेर येण्याची घाई यावर बेकेटनंही लिहिलेलं आहे. सिच्युएशन आणि एक्झिट दोन्हींमध्ये डिनायल ऑफ रिअॅलिटी आहे. सिनेमातला काळोख संमोहनापूर्वीच्या आवश्यक अशा दिवास्वप्नासारखी परिस्थिती घडवतो. हा काळोख एक प्रकारचा धूसर, सेन्सुअल रंग आहे. इथं सैल सोडता येतं स्वतःला. सभागृहासारखं सभ्यपणे नाही बसलं तरी चालतं. या नागरी अवकाशातल्या काळोखात देहाला मुक्ती मिळाल्याची अनुभूती होते. प्रेक्षकाला स्वतःचा कोश करून वासना विकारांसह स्वतःशी संवादायला अवकाश मिळतो. .............................................. अंधाराचं वरदान अमोल उद्गीरकर स्टीव्हन स्पीलबर्ग जे बोलतो त्याची बातमी होते आणि तो जे मत मांडतो त्यावर चर्चा होतात .स्पीलबर्गने काही दिवसांपूर्वी असंच एक विधान केलं आणि चर्चेचा धुरळा उडाला .स्पीलबर्गच नेटफ्लिक्स आणि तत्सम ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपन्यांबद्दल असलेलं प्रतिकूल मत हे काही लपून राहिलेलं नाही . नेटफ्लिक्सच्या 'रोमा ' सिनेमाला ऑस्कर नॉमिनेशन मिळाल्यावर स्पीलबर्गने जाहीर नापसंती व्यक्त केली होती . स्पीलबर्गचा हा नेटफ्लिक्सवरचा आकस हा नेमका कुठून आलाय ? तर स्पीलबर्गच्या मते ,सिनेमा हा सिनेमाहॉल मध्ये जाऊनच अनुभवायची गोष्ट आहे . तुमच्या टीव्हीवर किंवा कंप्युटर स्क्रीनवर अनुभवण्याची नाही . आता मी स्वतः नेटफ्लिक्स , अमेझॉन प्राईम ,हॉटस्टार यांच्यावर रेग्युलर बेसिसवर सिनेमे बघतो . ह्या ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपन्या माझ्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा आहेतच .तरी पण सिनेमा ही सिनेमागृहात जाऊन अनुभवण्याचीच गोष्ट आहे या स्पीलबर्गच्या विधानाशी मी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे . आणि सिनेमा थिएटरातच जाऊन का बघावा याची अनेक कारण आहेत .त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे सि ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .