चित्रस्मृती-अर्थात फोटोंच्या आठवणी/ दिलीप ठाकूर

रुपवाणी    Dilip Thakur    2019-06-14 10:00:44   

चित्रस्मृती दोन 'वैरी दिग्दर्शकांचा' एक हुकमी हीरो सत्तरच्या दशकातील अमिताभ बच्चन प्रामुख्याने ह्रषिकेश मुखर्जी, प्रकाश मेहरा, यश चोप्रा, रमेश सिप्पी आणि मनमोहन देसाई या दिग्दर्शकांनी घडलेला/आकाराला आलेला. पटकथा आणि संवाद लेखक सलिम-जावेद यांनी अमिताभला अँन्ग्री यंग मॅनची इमेज दिली ( अर्थात 'जंजीर ' १९७३) तरी चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्याने अमिताभ आणि त्याचे दीर्घकालीन दिग्दर्शक हा एक अभ्यासाचा विषय आहे. प्रकाश मेहरा आणि मनमोहन देसाई यांच्या दिग्दर्शनातील अमिताभ हे स्वतंत्र प्रकरण आहे. प्रकाश मेहरानी अमिताभवर त्याच्या सुरुवातीच्या पडत्या काळात विश्वास दाखवला हे विशेष. अमिताभच्या साठीच्या निमित्ताने रविवार लोकसत्तासाठी प्रकाश मेहरा यांच्या मुलाखतीचा योग आला असता प्रकाश मेहरा मला म्हणाले, धर्मेंद्र इतर चित्रपटात बिझी झाल्याने आपल्या 'समाधी 'या चित्रपटाच्या दुहेरी भूमिकेसाठी तारखा देऊ शकत नव्हता म्हणून 'जंजीर' बनवायचे ठरवले आणि 'बाॅम्बे टू गोवा' पाहून अमिताभची निवड केली..... तुलनेत मनजींच्या चित्रपटात अमिताभ उशिरा आला.फार पूर्वी एका दिवाळी अंकासाठी अमिताभ या विषयावर मनजींची मुलाखत घ्यायचा योग आला असता ते म्हणाले, 'हेरा फेरी 'मधील अमिताभची काॅमेडी पाहून 'अमर अकबर अँन्थनी'मधील अँन्थनीच्या भूमिकेसाठी त्याला निवडले. या दोन्ही दिग्दर्शकांच्या चित्रपटातून अमिताभ जनसामान्यांचा लाडका म्हणून लोकप्रिय झाला. दोघांचेही अमिताभसोबतचे पिक्चर ( त्या चित्रपटांचे स्वरुप पाहता योग्य वर्णन) सातत्याने सुपर हिट. अपवाद 'गंगा जमुना सरस्वती ' ( या फ्लाॅप चित्रपटानंतर मनजीनी दिग्दर्शन थांबवले) आणि 'जादुगर ' (या फ्लाॅप चित्रपटानंतर प्रकाश मेहराच्या चित्रपटातून अमिताभ कायमचा बाद झाला आणि स्व ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen