रिमेकचा ट्रेंड वाढतोय ….

रुपवाणी    Aniruddha Prabhu    2019-06-16 10:27:51   

रिमेकचा ट्रेंड वाढतोय …. अनिरुद्ध प्रभू ........................ गेल्या काही दिवसात सातत्याने बॉलीवूडमधून रिमेक्स च्या बातम्या येत आहेत. आज जॉन अब्राहाम याने तामिळ भाषेतल्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या ' वेदालाम ' या सिनेमाच्या हिंदी रिमेकबाबत मत व्यक्त केलं आणि पुन्हा या रिमेकच्या ट्रेंड बाबत काही प्रश्न समोर आले .. रिमेक चा अर्थ पुन्हा बनवणे असा होत असला तरीही सिनेमाच्या बाबत त्याचे अर्थ पैलू नुसार बदलतात. तुम्ही मूळ सिनेमा आणि नवीन करू घातलेल्या सिनेमात काय साम्य आणि फरक ठेवता यावर हे पैलू बहुतांशी अवलंबलेले असतात. मूळ सिनेमा आहे तसा , त्याच ढाच्यात फक्त भाषा आणि कलाकार बदलून पुन्हा बनवणे हा यातला प्रचलित पैलू आहेत. त्यानंतर मूळ सिनेमाची कथा आणि त्याचा ऑरा अजिबात न बदलता त्याची पटकथा , कलाकार वगैरे बदलून नवीन सिनेमा करणं हा त्याखाली प्रचलित असलेला पैलू होय. त्यांनतर मात्र दिग्दर्शक आणि लेखक यांच्या मेहनतीला आणि प्रतिभेला समोर आणणारे काही पैलू समोर येतात. रिमेक ही पुनर्निर्मिती असली तरी सिनेमाच्या बाबत तरी दरवेळी नावीन्य असणारी असेलच असे नाही किंबहुना तशी नसतेच हे गृहीतक आज तरी मान्य आहे. मुख्य प्रवाहातल्या सिनेमासाठी रिमेक हा आजचा मुद्दा नसला तरीही त्याची वारंवारिता आजच्या एवढी नव्हती हे मात्र मान्य करायला हवं. तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेनुसार अन्य भाषेतील उत्तम सिनेमे माध्यम किंवा भाषा न बदलता इतर समाजापर्यंत पोचणं कठीण होतं हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. आज ती परिस्थिती नाही. इंटरनेट आणि त्याची सह माध्यमं यांच्या मदतीने इतर भाषिक सिनेमे बघण्याचे ही प्रमाण बरंच मोठं आहे. इतकं असूनही गेल्या काही वर्षात हा ट्रेंड बॉलिवूड मध्ये अधिक घट्ट पणे रुजताना दिसत आहेच पण त्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen