सिनेमा आणि समलैंगिकता २०१८ मध्ये समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर परिस्थिती काहीशी बदलली आहे असं म्हणायला वाव असला तरी मेहताच्या ‘फायर’वरून गदारोळ माजलेला भारत आणि अगदी अलीकडेपर्यंतचा भारत यांत समलिंगी प्रेमाकडे पाहण्याच्या दृष्टीने सामाजिक स्तरांवर फारसा फरक दिसून येत नाही. ........................................................... २८ जून १९६९ मध्ये अमेरिकेतील मॅनहॅटन शहरातील एका समलैंगिक व्यक्तींसाठीच्या बारमध्ये पोलिसांनी धाड टाकली. तिथे उपस्थित असलेल्या जमावाने या अन्यायी प्रकरणाचा विरोध केल्याने दंगा घडून आला. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम घडून कालांतराने जगभरात जून महिना ‘गे/एलजीबीटीक्यू प्राइड मंथ’ म्हणून पाळला जातो. यादरम्यान जगभरात समलैंगिक व्यक्तींप्रती केला जाणारा भेदभाव आणि हिंसा यांच्याविरुद्ध प्रदर्शनं घडून येतात. याखेरीज लिंगभेद, समलैंगिक व्यक्तींचे हक्क, लिंगसमभाव, इत्यादी गोष्टींबाबत जनजागृती घडवून आणणं सुद्धा या परेड्सचा उद्देश असतो. समलैंगिकता आणि समलैंगिक व्यक्तींना नाकारले जाणारे हक्क यांचा आणि धर्म, संस्कृती, रूढी-परंपरा यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे जिथे पाश्चात्य देशांमध्येही समलैंगिक संबंधांना एक बराच विस्तृत काळ कायदेशीर-सामाजिक मान्यता मिळाली नव्हती, किंवा जिथे अजूनही समलिंगी व्यक्तींवर हल्ले घडून येत असतात तिथे भारतासारख्या देशात अगदी अलीकडेपर्यंत समलिंगी प्रेम अनैसर्गिक मानले जात होते (किंवा अजूनही जात आहे) यात विशेष नवल नाही. त्यामुळेच अगदी गेल्या वर्षीपर्यंत भारतात समलैंगिक संबंध बेकायदेशीर ठरून असे संबंध ठेवणे म्हणजे अजामीनपात्र गुन्हा मानला जात होता. असं असताना खरंतर समाजाचा आरसा मानल्या जाणाऱ्या सिनेमासारख्या माध्यमातू ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .