इफी 2013 - द पास्ट : वर्तमानाचा सामना करताना...


असगर फरहादी या इराणी दिग्दर्शकाच्या ‘अ सेपरेशन’ या सिनेमाने दोन वर्षांपूर्वी सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमासाठीचं ऑस्कर पारितोषिक मिळवलं असल्यामुळे आणि जगभरच्या महोत्सवांमध्ये पुरस्कार तसंच प्रेक्षकांकडून वाहवा मिळवलेली असल्याने या वर्षीच्या इफीमध्ये सगळ्यांनाच त्यांच्या ‘द पास्ट’ या नवीन सिनेमाविषयी उत्सुकता होती. आणि ‘द पास्ट’ने अजिबात निराशा केली नाही. नुकताच विमानातून उतरून तो बाहेर पडतोय. बाहेर, काचेच्या पलीकडे ती त्याला पाहते, हाक मारते. अर्थातच त्याला ती ऐकू जात नाही. एक मुलगी त्याचं लक्ष तिच्याकडे वेधते. तो तिच्या जवळ येतो. अजूनही ती काचेच्या पलीकडेच. तो काहीतरी बोलतो. तिला ऐकू येत नाही. ती काहीतरी म्हणते. त्याला समजत नाही. दोघेही एकमेकांकडे बघून हसतात आणि तो बाहेरच्या पडायच्या दिशेने चालू लागतो... सिनेमाचं पहिलंच दृष्य प्रेक्षक म्हणून आपली उत्सुकता चाळवतं. काय नातं आहे दोघांमध्ये? ती त्याची एवढ्या उत्सुकतेने का वाट पाहतेय? खूप वर्षांनी भेटताहेत का हे दोघे? काही क्षणांत निर्माण होणार्‍या मनातल्या प्रश्नांना इराणी दिग्दर्शक असगर फरहादी यांचा ‘द पास्ट’ हळूहळू उत्तरं देऊ लागतो. ते करताना आणखी प्रश्न निर्माण करतो. प्रत्येक टप्प्यावर ‘आता आपल्याला सगळं समजलं’ असं वाटू लागलेलं असतानाच नवीन धक्का देतो. थोडासा मेलोड्रामा, थोडीशी कलाकुसर, थोडा बेरकीपणा या सगळ्यांचा दिग्दर्शक म्हणून वापर करून आपल्यासमोर एक खणखणीत अनुभव सादर करतो. फरहादींचा या आधीचा ‘अ सेपरेशन’ हा सिनेमा इराणमध्ये घडतो. त्यातली दोन्ही जोडपी ही इराणी आहेत. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातली असली तरी त्यांचा भोवताल एक आहे. इथे, या सिनेमात गोष्ट घडते फ्रान्समध्ये. आणि सिनेमाचं नाव जरी ‘द पास्ट’ असं असलं तरी त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen