चित्रस्मृती कर्णधार देव आनंदच्या संघात आमिर खान फलंदाज.... देव आनंद कुठेही असला तरी देव आनंदच असायचा, मग ते क्रिकेटचे मैदान का ना असेना? क्रिकेटचे मैदान म्हटल्याने तुम्हाला 'गुगली ' पडल्यासारखे वाटले काय? 'लव्ह मॅरेज 'या चित्रपटात तो क्रिकेट खेळलाय आणि मैदानातून त्याला स्टॅन्डमध्ये बसलेली माला सिन्हा दिसते आणि फटकेबाजी केल्यावर तो गातो, एक नजर मे दिल बेचारा हो गया एलबीडब्ल्यू.... देव आनंदचे हे पडद्यावरचे क्रिकेट प्रेम इतक्यावरच थांबले नाही , तर त्याने क्रिकेटला पटकथेच्या केन्द्रस्थानी ठेवून 'अव्वल नंबर ' ( १९८९) नावाचा चित्रपट निर्माण केला. अर्थात, यात तोच हीरो होता, त्याचेच दिग्दर्शन होते. तोच खरं तर पटकथेच्या केन्द्रस्थानी होता. ( हरे राम हरे कृष्ण वगळता त्याने आपण निर्मिलेल्या चित्रपटात हेच सातत्य कायम राखले). देव आनंदला आणखीन एक हौस होती. तो मिडिया फ्रेन्डली होता. आपल्या चित्रपटाच्या मुहूर्ताला ( अनेकदा तरी मेहबूब स्टुडिओत) आणि शूटिंगला तो आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून सेटवर बोलवायचा. 'शूटिंग करता करता ' तो छान संवाद साधायचा, त्याला सतत कोणीतरी ऐकणारा लागे हे माझ्या लक्षात आले. आणि पत्रकाराला तर मजकूर हवा असतोच.... 'ऑलराऊंडर 'साठी तो चक्क ब्रेबाॅर्न स्टेडियमवर शूटिंग करीत असताना सेटवर जाण्याचा योग आला. असे क्षण अनुभवण्यात एक गंमत असे. मैदानात प्रचंड उन्हात देव आनंद आमिर खान आणि इतरांना 'क्रिकेट खेळण्याचा अभिनय ' समजावून सांगत होता. खुद्द आमिर खान पाली हिलमध्ये टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळला असल्याने त्याला 'दिग्दर्शकाच्या सूचना ' पटकन समजत होत्या. त्यात काय विशेष असेच त्याचे एक्सप्रेशन होते. देव आनंदची एक गोष्ट चांगली होती की, सेटवर त ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .