कबीर सिंग: हिंसेचे उदात्तीकरण की हिंसेच्या प्रवृत्तीचा अभ्यास?


सिनेमात दाखवल्या जाणा-या  एखाद्या पात्राला स्वतःचा एक स्वभाव असतो हा विचारही या लोकांना सुचत नाही. अमुक एक मुलगी असेल तशी, त्यावरुन हा निष्कर्ष काढायची काय गरज? जर काही निष्कर्ष काढायचाच असेल तर एकूण सिनेमा काय सांगू पाहतोय, किंवा काय काय सांगू पाहतोय याचा काढावा, केवळ एका पात्राच्या स्वभावावरून, त्याच्या कृत्यांवरून काढू नये.

कबीर सिंग: हिंसेचे उदात्तीकरण की हिंसेच्या प्रवृत्तीचा अभ्यास?

- अभय साळवी   प्रथम एक गोष्ट नमूद करणे गरजेचे आहे, की एखादा सिनेमा जर दुसऱ्या सिनेमाचा अधिकृत रिमेक असेल तर नवीन सिनेमा आधीच्या सिनेमासारखा तंतोतंत तसाच असला तरी त्यात काहीच वावगं नाही. या निकषावर कुठलाच कमीपणा त्या नवीन अधिकृत रिमेकला लावला जाऊ नये.   मी व्यक्तिशः कबीर सिंग ज्या मूळ तेलुगू सिनेमाचा (अर्जुन रेड्डी) रिमेक आहे तो पाहिलेला नाही, पण ऐकून वाचून हे कळतं आहे की जवळजवळ दोन्ही सिनेमे एकसारखेच आहेत. आणि हा 'कबीर सिंग’ चा दोष मानला जातोय, जे अनावश्यक आहे.   हिंदी सिनेमाची परंपरा अनेकार्थी पुरुषप्रधान आहे/होती या बद्दल दुमत नसावं. पुरुषाचे पारंपरिक व्याख्येत बसणारे पुरुषपण सतत पाझरत राहण्याची जबाबदारी सिनेमातल्या नायकांवर असायची/असते. स्त्रिया अनेकदा पुरुषांच्या अवतीभवती आपलं लहानसं अस्तित्व कवटाळात दिसल्या आहेत. त्यापलीकडे त्यांचा स्वतःचा असा काहीच संघर्ष नसतो. ज्या प्रकारे हिरोचा मित्र, आई, वडील, तशीच ती. ‘कबीर सिंग’ मधल्या नायिकेची भूमिका पाहता, तिचे एकूण संवाद पाहता प्रथमदर्शनी असंच वाटेल की याच थोर परंपरेतली ही नायिका आहे, पण खरंतर या पलीकडे विचार केला तर असल्या परंपरेचा वगैरे विचार आपल्याला शिवणार नाही.

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. milindKolatkar

      6 वर्षांपूर्वी

    वेबसाईटवर सर्व सभासदत्व लागु झालेय, इथं नाही! प्लीज मदत करा? धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen