चित्रस्मृती


चित्रस्मृती 'दीवाना 'चा मुहूर्त आणि शाहरूखचा आत्मविश्वास... जे काही असेल ते असो, पूर्वीच्या हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन चित्रपटाचा भव्य दिव्य मुहूर्त म्हणजे जणू एक सणच वाटे आणि तसाच ते साजरा करीत. 'दीवाना ' ( रिलीज २६ जून १९९२) चा मुहूर्त त्याला अपवाद का बरे ठरावा? शाहरूख खानचा रिलीज झालेला पहिला चित्रपट हा आहे. खरं तर तो 'सर्कस ' आणि 'फौजी ' या दूरदर्शनच्या मालिकेत लक्षवेधक भूमिका साकारत असतानाच हेमा मालिनीने आपला दिग्दर्शनीय पहिला चित्रपट 'दिल आशना है ' ( रिलीज जानेवारी १९९३) या चित्रपटासाठी त्याला दिव्या भारतीचा नायक म्हणून निवडले आणि मग हीच जोडी दिग्दर्शक राज कंवरने 'दीवाना 'साठी कायम ठेवली. तसा या चित्रपटाचा हीरो ऋषि कपूर होता, पण 'दीवाना ' रिलीज होताच खलनायकी छटा उत्तमरितीने साकारलेला शाहरूख पब्लिकला असा काही आवडला की तोच स्टार झाला. आणि त्याचा हाच आत्मविश्वास या चित्रपटाच्या मुहूर्ताला जाणवला हे विशेष कौतुकाचे आहे. आज शाहरूख खान कुठेही असला तरी शाहरूख खानच असतो, याचा विसर तो स्वतःला आणि इतराना पडू देत नाही याची त्याचा स्वभावही 'दीवाना 'च्या मुहूर्ताच्या क्षणीच अनुभवला. ( अशा छोट्या परन्तु स्टारची स्वभाव वैशिष्ट्ये गोष्टींसाठीच फिल्मी मुहूर्ताना हजर राहण्याचा आनंद मिळे.) .      जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमधील या मुहूर्ताला दिग्दर्शक शेखर कपूरने 'अॅक्शन ' म्हटलं तर राहुल रवैलने मुहूर्त क्लॅप दिला. चित्रपटाच्या मुहूर्ताला पाहुण्यांना असे सन्मानित केले जाते बरं का? ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen