तेरे बिना जिंदगी से......


तेरे बिना जिंदगी से......

  पंचम उर्फ आर डी बर्मन आज हयात असते तर कालच्या २९ जून रोजी ते ८० वर्षांचे झाले असते. त्यांच्या कालातीत संगीताच्या या काही सूरेल आठवणी..   तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं...!!!! आजही या उदास विराणीचे सूर कानी पडले की मन हळवे होते,त्या गीताच्या हळुवार चालीत आणि शब्दात गुंतून जाते...अशा कितीतरी अनमोल गीत रत्नांनी "पंचम" नामक सुरांच्या जादूगाराने रसिक मनात अढळ स्थान मिळविले आहे..."छोटे नवाब" पासून सुरू झालेला हा सुरेल प्रवास "१९४२लव्ह स्टोरी" पर्यंत येऊन थांबतो खरा....पण यात कितीतरी मधुर थांबे येतात...तिसरी मंझील,बहारो के सपने,पडोसन,कारवा,कटी पतंग,यादों की बारात,अमर प्रेम,आप की कसम, शोले,मेरे जीवन साथी, परिचय,खुशबू,किनारा,घर,आंधी, इजाजत, १९४२ लव्ह स्टोरी असे कितीतरी....!!!आपल्या अप्रतिम संगीताने रसिकांना मोहविणाऱ्या या कलंदर संगीतकाराची ,राहुल देव बर्मन यांच्या जयंती निमित्ताने त्यांना लक्ष लक्ष प्रणाम...!! सचिनदा आणि मीरादेव बर्मन यांचा हा सुपुत्र....!!!आईच्या कुशीत संगीताची ओळख झालेली...संगीत त्याच्या रक्तात भिनले होते."ब्रजेश विश्वास" यांच्याकडे "तबला" तर "उस्ताद अली अकबर खान" यांच्याकडे "सरोदचे" शिक्षण त्यांनी घेतले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी "ए मेरी टोपी पलट के आ"ही धून त्यांनी बनवली जी सचिनदांनी "फंटुश"चित्रपटात वापरली..."सोलहवा साल" या चित्रपटातील "है अपना दिल तो आवारा" आणि"जानेवालो जरा(दोस्ती) "या गीतातील माऊथ ऑर् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen