आर्टिकल १५


स्वतंत्र भारतातील पहिला गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन जवळपास सत्तर वर्षांनी जर भारतात आला तर त्याला कसला भारत  दिसणं अपेक्षित असेल ? साहजिकच स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतर कायदा आणि सुव्यवस्था असलेलं एक प्रगत, शांतीपूर्ण, सामाजिक सलोखा जपणारा समाज असलेलं राष्ट्र दिसणं त्याला अपेक्षित असावं. त्यासाठी आपली ख्यातीही आहे. विविधतेत एकता जपणारं आणि शांततेचा पुरस्कार करणारं राष्ट्र म्हणूनच जग आपल्याकडे बघतं. आपणही ही बाब अभिमानाने मिरवतो. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का ?

आर्टिकल १५

  स्वतंत्र भारतातील पहिला गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन जवळपास सत्तर वर्षांनी जर भारतात आला तर त्याला कसला भारत  दिसणं अपेक्षित असेल ? साहजिकच स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतर कायदा आणि सुव्यवस्था असलेलं एक प्रगत, शांतीपूर्ण, सामाजिक सलोखा जपणारा समाज असलेलं राष्ट्र दिसणं त्याला अपेक्षित असावं. त्यासाठी आपली ख्यातीही आहे. विविधतेत एकता जपणारं आणि शांततेचा पुरस्कार करणारं राष्ट्र म्हणूनच जग आपल्याकडे बघतं. आपणही ही बाब अभिमानाने मिरवतो. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का ? अयान रंजन (आयुष्यमान खुराणा ) हा युरोपात शिकलेला आणि आई वडिलांच्या इच्छेखातर भारतात येऊन आयपीएस झालेला ऑफिसर नुकताच बदली होऊन लालगाव या ( काल्पनिक ) गावाला जात आहे. युरोपात शिकलेल्या एका एनआरआएच्या मनात भारताबद्दल ज्या संकल्पना, भावना असतात त्या त्याच्या मनात आहेत. या प्रवासात त्याला जे काही वाटतं ते तो त्याच्या मैत्रिणीसोबत मॅसेजद्वारे शेयर करत आहे. तो युरोपातून आलेला आणि सुटबुटातला आयपीएस ऑफिसर आहे म्हणून त्याची मैत्रीण चेष्टेने त्याला माउंटबॅटन म्हणते. पण जसं जसं तो देशाच्या गाभ्यात ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रिया

  1. prasadsahsrabuddhe

      2 वर्षांपूर्वी

    अतिशय चपखल परीक्षण ! मी संपूर्ण कुटुंबासहीत Article 15 पाहिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नवीन पिढीशी उत्तम कनेक्ट होता येतं ! ?वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.