लग जा गले.... ७ फेब्रुवारी १९६४ ला "वो कोन थी" रिलीज झाला आणि अडीच वर्षांतच २९ जुलै १९६६ रोजी या चित्रपटाचे गीतकार राजा मेहंदी अली खान यांचं निधन झालं. 'वो कौन थी' साठी दिलेलं 'लग जा गले..' हे अप्रतिम गाणं दिग्दर्शक राज खोसला यांनी आधी रिजेक्ट केलं होतं. हे गाणं नाकारल्याचं राजाजींना विलक्षण दुःख झालं, त्यांनी आपल्या भावना संगीतकार मदन मोहन यांच्या कानावर घातल्या. इतकं चांगलं अर्थपूर्ण गाणं नाकारल्यामुळे मदनजींनाही वाईट वाटलं. त्यांनी चित्रपटाचा नायक असलेल्या मनोजकुमारना बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडे निरोप दिला की एकदा राज खोसलांनी पुन्हा एकदा गाणं ऐकावं अशी विनंती केली जावी. दुसऱ्यांदा गाणं ऐकताच राज खोसला दिग्मूढ झाले. गाणं आधी रिजेक्ट केल्याचा त्यांना खेद झाला. सिनेमा सुपरहिट झाला. हॉरर प्लस रोमान्सचा नवा ट्रेंड आला. या चित्रपटातली गाणीही हिट झाली तरी राजा मेहंदी अली खान मात्र आपल्या दुःखात बुडाले होते. जीव लावून लिहिलेली गाणी लोक डोक्यावर घेताहेत पण आपल्या भावनांचं काय हा प्रश्न त्यांना सतावत असावा. 'लग जा गले...' ची दास्तान शोकात्मकतेकडे झुकणारी आहे. आपण एखादं गाणं गुणगुणत असतो. त्यातला अर्थ भावला, ती रचना आवडली, त्यातली धून पसंत पडली तर ते गाणं आपल्याला मनापासून आवडतं. ते गाणं कुठं तरी आपल्या काळजाला स्पर्श करत असलं तर मग बाकीच्या गोष्टींची नोंद अनाठायी ठरते. ही गाणी आपल्या मनात कोरली जातात, त्यांना अढळस्थान असते. असंच फिलिंग 'लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो..' या अवीट गोडीच्या देखण्या गीताबाबतीत आहे. या गाण्याची पार्श्वभूमी दुःखद आहे... गीतकार राजा मेहंदी अली खान यांची रोमँटिक गीतं हॉन्टेड कॅटेगरीमधली वाट ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Nishikant
6 वर्षांपूर्वीअप्रतिम!