चित्रस्मृती ''परवाना ' फस्ट रनचा आणि रिपिट रनचा....''


सिनेमाच्या जगातील असंख्य तरी गोष्टींबद्दल तुम्ही/आम्ही/खरं तर कोणीही असेच का असे न विचारलेले अधिकच चांगले.  जे जे घडतय त्याचे मात्र निश्चित काही अर्थ अथवा निष्कर्ष असतातच... चित्रस्मृती 'परवाना ' फस्ट रनचा आणि रिपिट रनचा.... सिनेमाच्या जगातील असंख्य तरी गोष्टींबद्दल तुम्ही/आम्ही/खरं तर कोणीही असेच का असे न विचारलेले अधिकच चांगले. जे जे घडतय त्याचे मात्र निश्चित काही अर्थ अथवा निष्कर्ष असतातच... अमिताभ बच्चनची भूमिका असलेला ज्योती स्वरुप दिग्दर्शित 'परवाना ' ( रिलीज २५ जून १९७१) तुम्हाला माहितच असेल. इतकेच नव्हे तर त्यात अमिताभ मुंबई ते नागपूर याच्या ट्रेन प्रवासाची आणि विमान प्रवासाची वेळ यांचा ताळमेळ कसा घालतो आणि आपला हेतू कसा साध्य करतो अशी पटकथाही तुमच्या डोळ्यासमोर आली असेलच. तो प्लॅन या चित्रपटाचा आत्मा होता. कालांतराने 'जाॅनी गद्दार 'मध्ये याच 'आयडियाची कल्पना ' चतुराईने वापरलीय. जुन्या चित्रपटातील नेमके काय आणि कधी उपयुक्त ठरेल हे सांगता येत नाही यापेक्षा ते कसे हुशारीने एकाद्या चित्रपटात पेरता येईल अशी हुशारी हवी. 'परवाना ' प्रदर्शित झाला तेव्हा अमिताभचा सुरुवातीचा 'पडता काळ ' होता. नायक म्हणून प्रेक्षक त्याला स्वीकारत नव्हते म्हणूनच त्याने या चित्रपटात खलनायकाची भूमिका स्वीकारली. आणि या चित्रपटात हीरो होता, नवीन निश्चल. त्या काळातला चिकना हीरो. आपला पहिलाच चित्रपट 'सावन भादो 'च्या ( रेखाचाही तोच पहिला चित्रपट) ज्युबिली हिटने उसकी तो निकल पडी. चित्रपटाच्या जगात यशासार ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. gadiyarabhay

      2 वर्षांपूर्वी

    सुंदर आठवणी. परवानाच्या निमित्ताने सुपर टॉकीज आठवलं आणि मनाने इमपीरिअल, नाझ, स्वस्तिक, मिनर्वा आणि अप्सराच्या विभागात जाऊन पोचलो. चित्रपट मुख्य थिएटर कुठलं यावर त्याची ग्रेड ठरण्याचा काळ.वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.