जायरा वसीमने घेतलेला स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय हा अडनेड्या वयातील अपरिपक्व बुद्धीने घेतला की समाजाच्या किंवा कुटुंबाच्या दबावापोटी घेतला ह्यावर काही भाष्य करण्याआधी मागील काही घटनांचा मागोवा घेणं गरजेचं आहे.जायरा वसीमच्या स्वेच्छानिवृत्ती निमित्ताने........
दंगल, सिक्रेट सुपरस्टार ह्या सिनेमांच्या माध्यमातून बाल कलाकार म्हणून नावारूपास आलेली अभिनेत्री जायरा वसीम हिने चित्रपटसृष्टीतून अकाली स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची घोषणा केली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण, एखाद्या अभिनेत्रीने करीयर नुकतेच सुरू झालेले आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असताना वयाच्या एकोणिसाव्या वर्षी स्वत:हून सिनेसृष्टीतील करीयर संपवण्याची ही पहिली वेळ आहे. आणि त्यामगचं कारणही चक्रावून टाकणारे आहे. मुस्लिम समाजातील जायराला कुराण ह्या मुस्लिम धर्मग्रंथानुसार आपण चुकीचे काम करत असल्याची जाणीव झाली आणि तिने समाजमाध्यमांवर निर्णय जाहीर केला. हा निर्णय अडनेड्या वयातील अपरिपक्व बुद्धीने घेतला की समाजाच्या किंवा कुटुंबाच्या दबावापोटी घेतला ह्यावर काही भाष्य करण्याआधी मागील काही घटनांचा मागोवा घेणं गरजेचं आहे. जेव्हा दंगल ह्या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रसिद्ध झाली तेव्हा अस्खलित हरयाणवी भाषेत बोलणाऱ्या चुणचुणीत जायराचे चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमधून कौतुक होऊ लागले. तेव्हा समजले की ही चिमुकली जम्मू-काश्मीर मधील एका बँक मॅनेजर आणि शिक्षिका असलेल्या मुस्लीम दांपत्याची मुलगी आहे. शाळेत एक ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
bookworm
6 वर्षांपूर्वीजायरा वसीमवरती दबाव आला असण्याची शक्यता आहे.आपल्या हातात प्रतिक्रिया व्यक्त करण्याखेरीज काय आहे?