चित्रस्मृती खुद्द माधुरीनेच ही 'सेटवरची स्टोरी " चित्रपटाच्या यशाची हॅटट्रीक झाल्याच्या निमित्ताने अंधेरीतील जे. बी. नगरमधील घरी मुलाखत देताना मला सांगितली, तेव्हा माझ्या तोंडून पटकन निघाले, ओये ओये... 'तेजाब ' हिट झाला आणि 'त्रिदेव 'च्या गाण्यात माधुरीला महत्व आले...... चित्रपटाच्या जगात यशासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नाही आणि ती लाभली की काहीही होऊ शकते. ती तर वेगळीच स्टोरी असते. गुलशन राॅय निर्मित आणि राजीव राॅय दिग्दर्शित 'त्रिदेव ' ( रिलीज ७ ऑक्टोबर १९८९) मधील "ओये ओये" गीत संगीत व नृत्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या मसालेदार मनोरंजक चित्रपटात अपेक्षेप्रमाणे म्हणा अथवा अपेक्षेपेक्षा जास्त म्हणा, पण अतर्क्य/अतिरंजित गोष्टी खूपच होत्या ही तर राजीव राॅयची दिग्दर्शन शैली. असेच काही या फिल्ममध्ये पाह्यला मिळणार याची खात्री या फिल्मच्या अंधेरीतील नटराज स्टुडिओतील मुहूर्ताच्या क्षणीच लक्षात आली. त्या काळात मोठ्या हिंदी चित्रपटाचे मोठ्ठे सेट लावून मोठ्ठे मुहूर्त होत आणि आम्ही सिनेपत्रकार अशा मुहूर्तावर मोठ्ठ असे काही लिहित असू, प्रत्येक काळाची काही वैशिष्ट्ये असतात म्हणा. असो... तर त्यातलाच एक अद्भुत चमत्कार म्हणजे, नसिरुद्दीन शहा आणि सोनम यांच्यावरचे 'तिरछी टोपीवाले ' हे 'सिनेमातील सिनेमा' असलेले गाणे आणि त्यातली ओये ओये ही आरोळी. हीच आरोळी 'गजर ने किया है इशारा...' या गाण्यातही आहे. माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी आणि सोनम या अमरीश पुरीच्या अड्ड्यावर गातात/नाचतात आणि ‘ओये ओये’ आरोळीही देतात. या गाण्याच्या चित्रीकरणाची आठवण भारी आहे, माधुरीचा 'तेजाब ' १९८८ च्या दिवाळीच्या दिवशी, मग 'राम लखन ' १९८९ च ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
jyotsnasonalkar
6 वर्षांपूर्वीविश्वास बसत नाही, पण यश व प्रसिद्धी याची गणितेच वेगळी