चेर्नोबिल – एक दडपलेले वास्तव


नोबेल विजेत्या स्वेटलाना अलेक्सीविच यांनी लिहिलेल्या "व्होईसेस फ्रॉम चेर्नोबिल" या पुस्तकावर आधारित ही मालिका जॉन रेंक यांनी अशा पद्धतीने दिग्दर्शित केली आहे की आपण त्या सत्याच्या शोधाचा एक भाग बनून जातो......क्षणभर वाटते कि आपण सत्यघटना बघत आहोत.
चेर्नोबिल – एक दडपलेले वास्तव
                           ✍ सुहास किर्लोस्कर
जगभरात अनेक भीषण घटना घडत असतात, ज्यामधून अगणित लोकांचे मृत्यू होतात, अनेक लोक जखमी होतात.  काही घटनांचे परिणाम दुरोगामी असतात ज्याच्या झळा अनेक पिढ्याना सोसाव्या लागतात.  आपल्याकडची भोपाळ दुर्घटना असो वा रशियामध्ये झालेला चेर्नोबिल स्फोट.  माणसांचा हलगर्जीपणा बऱ्याच वेळेस कारणीभूत ठरतो.  अशा दुर्घटना घडण्याआधी आपल्याला पूर्वसूचना मिळत असते पण माणूस या नात्याने आपण दुर्लक्ष करतो आणि शेकडो, हजारो जीव हकनाक मरतात.  अगदी अलीकडे संरक्षक भिंतीखाली काही जीव गेले तर धरण फुटल्यावर काही कुटुंबे उध्वस्त झाली.  याला जबाबदार कोण? खेकडे? प्रत्येक दुर्घटना झाल्यावर चौकशी समिती नेमली जाते आणि पाच सहा महिन्यानंतर हितसंबंध जपत निष्कर्ष काढले जातात.  Public memory is short.  याचा फायदा यंत्रणा घेते.  शिवाय दुर्घटना झाल्यावर मृतांचा आकडा नेहमीच खोटा सांगितला जातो.  हे निर्विवाद सत्य आपणा सर्वाना माहित आहे आणि त्याबद्दल आपण बातमी वाचण्यापलीकडे काहीही करत नाही.
हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘रुपवाणी’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘रुपवाणी’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

-->

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


वेब सिरिज

प्रतिक्रिया

  1. krmrkr

      2 वर्षांपूर्वी

    मी नुकतीच ही सिरीज पाहिली. त्या दिग्दर्शकाचे,अभिनेते , अभिनेत्रींचे कौतूक करण्यास शब्द अपूरे आहेत. पाचही भाग पाहून झाल्यायावर त्या रात्री झोप येत नाही.या स्वरूपाचा भारतातला अपघात भोपाळ गॕस दुर्घटना.आज नाही उद्या कोणीतरी त्याचेही विश्लेषण करणारी सिरीज रिलीज करतील. अशी वेबसिरीज बनवल्या बद्दल HBO अभिनंदनास पात्र आहे.

  2. mukundmk

      2 वर्षांपूर्वी

    सध्या लोकसत्ता रविवार पुरवणी लोकरंगमध्ये चालू असलेली मेधा पाटकर लिखित लेखमाला आठवली.वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.