हम भी ट्रुमन , तुम भी ट्रुमन ,हम सब ट्रुमनस


आपलं आयुष्य 'staged ' आहे किंवा 'scripted ' आहे असं तुम्हाला वाटत का ? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल तर तुम्ही 'ट्रूमन सिंड्रोम' ने ग्रस्त आहात . 'ट्रूमन सिंड्रोम' ही मानसशास्त्रातली संकल्पना आहे .ज्यांनी 'द ट्रुमन शो ' सिनेमा बघितलाय त्यांना कदाचित नावावरूनच अंदाज आला असेल .   हम भी ट्रुमन , तुम भी ट्रुमन ,हम सब ट्रुमनस आपलं आयुष्य 'staged ' आहे किंवा 'scripted ' आहे असं तुम्हाला वाटत का ? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल तर तुम्ही 'ट्रूमन सिंड्रोम' ने ग्रस्त आहात . 'ट्रूमन सिंड्रोम' ही मानसशास्त्रातली संकल्पना आहे .ज्यांनी 'द ट्रुमन शो ' सिनेमा बघितलाय त्यांना कदाचित नावावरूनच अंदाज आला असेल . ट्रुमन बरबँक (कलादेवतेच मानवजातीला वरदान असणारा जीम कॅरी )हा गृहस्थ हा एका छोट्या बेटावर लहानाचा मोठा झाला आहे . अतिशय साधं सरळ , तृप्त कुटुंबवत्सल आयुष्य जगणाऱ्या ट्रुमनला हळूहळू संशय यायला लागतो की आपल्या आजूबाजूला सगळंच आलबेल चालू नाहीये . आणि त्याला कळत की आपण अशा भवतालात राहतोय जो पूर्णपणे 'planned ' आहे . प्रत्येक गोष्ट नैसर्गिकपणे घडवण्याऐवजी 'घडवली ' जात आहे . आईच्या पोटात असल्यापासून ट्रूमनचं आयुष्य दूर जगात टीव्हीवर प्रसारित होत असत . तो ज्या बेटावर राहत असतो तो खरं तर एक सेट असतो . त्या बेटावर ट्रुमन सोडून सगळे व्यवसायिक अभिनेते आहेत .अगदी ज्यांना ट्रुमन आपले आई वडील , बेस्ट फ्रेंड ,बायको समजून ज्यांच्यावर मनापासून प्रेम करत असतो ते पण ट्रूमनवर प्रेम करण्याचा 'अभिनय ' करत असतात . ट्रुमनच प ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सोशल मिडीया , मनसंवाद

प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    “द ट्रुमन शो” हा सिनेमा मी पाहिलाय. जिम कॅरेने उत्तम काम केले आहे.. जीवन हे विसंगतीने भरलेले आहे. मानवी आयुष्यात अनेक अतर्क्य घटना घडत असतात.. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांपैकी ९९% घटना आपल्या नियंत्रणात नसतात.. अगदी जन्म आणि मृत्यू घ्या.. इब्राहीम जौक ची एक गज़ल आहे त्यातील पहिला शेर असा आहे.. “लायी हयात, आये, क़ज़ा ले चली, चले अपनी ख़ुशी न आये, न अपनी ख़ुशी चले” (क़ज़ा=मृत्यू) आपण इतके असहाय आहोत.. असे असताना ह्यावर माथाफोड करण्यापेक्षा, हे सगळं आधीच ठरलेले आहे.. अल मख्तूब. मख्तूब.. जो लिख्खा है वो लिख्खा है.. हे तत्त्व स्विकारले की आपल्या दैनदिन समस्यांकडे लक्ष द्यायला आपण मोकळे.. नियतीशरणतेत तथ्य आहे का नाही ? याचा उहापोह विद्वान करत बसतील..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen