चित्रस्मृती


चित्रस्मृती सत्तरच्या दशकात शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या नवीन चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीला सोमवारी लागणारी रांग ज्यांनी अनुभवलीय त्यांना त्यातला थरार, रोमांच, धाकधूक याची खूपच चांगली कल्पना असेल..... काही जण एव्हाना आपापल्या आठवणीत गेलेही असतील.   अबब.... सिनेमाच्या ऍडव्हास बुकिंगलाच एवढी प्रचंड रांग?   सत्तरच्या दशकात शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या नवीन चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीला सोमवारी लागणारी रांग ज्यांनी अनुभवलीय त्यांना त्यातला थरार, रोमांच, धाकधूक याची खूपच चांगली कल्पना असेल..... काही जण एव्हाना आपापल्या आठवणीत गेलेही असतील. तशी ही प्रथा साठच्या दशकात सुरु झाली आणि त्याचा जास्त प्रत्यय अथवा प्रभाव प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील मेन थिएटरवर असे. त्या काळात एकेक सुपर हिट चित्रपट अशा मेन थिएटरमध्ये पंचवीस अथवा पन्नास आठवडे सहज मुक्काम करे. राजेश खन्ना आणि मग अमिताभ बच्चनचा झंझावात सुरु झाला आणि या अॅडव्हास बुकिंग कल्चरमध्ये सातत्य आले, प्रतिष्ठा प्राप्त झाली. आणि त्यांच्या नवीन चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पहिल्या आठवड्याची सोमवारची पहाटेपासूनच रांगणारी रांग म्हणजे फिल्म वेड्यांचा जणू मेळा भरे. सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि मग दुपारी चार ते सायंकाळी सात अशी आगाऊ तिकीट विक्रीची वेळ. मराठा मंदिर चित्रपटगृहात 'मुगल ए आझम ' ( १९६०) च्या आगाऊ तिकीट विक्रीला लागलेल्या प्रचंड रांगेतील धक्काबुक्कीत एका प्रेक्षकावर चाकूने वार झाल्याचा किस्सा खूप मागची पिढी रंगवून सांगे. 'आराधना ' ( १९६९) च्या सुपर हिटनंतर राजेश खन्नाच्या अनेक नवीन चित्रपटाचे स्वागत असेच आगाऊ तिकीट विक्रीला खणखणीत प्रतिसादाने होऊ लागले. कटी पतंग ( राॅ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रस्मृती

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen