तिच्या गरजांची कथा आणि व्यथा


राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यातील मराठी-हिंदी व्यतिरिक्त इतर चित्रपटांची काहीच माहिती आपल्याला मिळत नाही. ही उणीव भरुन काढण्याचा हा प्रयत्न. यावर्षी सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या 'नातिचरामी' या चित्रपटाची ही ओळख. एकट्या स्त्रीच्या लैंगिक गरजांचा ,अत्यंत महत्वाचा विषय दिग्दर्शक मन्सूरे यांनी या चित्रपटातून कौशल्यानं मांडला आहे. श्रुती हरिहरन या अभिनेत्रीला या चित्रपटासाठी ज्युरींनी खास पुरस्कार दिला आहे. सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाबरोबरच या चित्रपटाला संकलन , सर्वोत्कृष्ट गायिका आणि सर्वोत्कृष्ट गीत रचनाकाराचा सुध्दा पुरस्कार मिळालेला आहे.

लग्नसंस्थेला समाज जीवनात मोलाचे स्थान आहे. फक्त भारतीयच नव्हे तर इतर देशांत, अन्य संस्कृतींमध्येही विवाह ही महत्वाची घटना मानली गेली आहे. लैंगिक गरज पूर्ण करणे आणि वंशवृद्धी या दोन महत्वाच्या बाबी हे विवाहाचे एक प्रमुख कारण समजले जाते. पण म्हणजे, लैंगिक गरज पूर्ण करण्यासाठी लग्नच केले पाहिजे का? यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला ‘नातिचरामी’ हा चित्रपट या आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करतो.

आई वडिलांचा विरोध पत्करून केलेल्या प्रेम विवाह केलेल्या  गौरी आणि महेशची ही गोष्ट आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर महेश अचानक अपघातात गेला आहे, त्याच्या मागे गौरी एकटीच आहे. ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. घरात एकटी राहते, पण तरीही ती अस्वस्थ आहे. नवरा नाही हे वास्तव तिने स्वीकारले आहे पण तरीही त्याच्या आठवणींमध्ये राहते आहे. घरात तो नसला तरीही त्याच्या सगळ्या खुणा आहेत.  त्याला नेहमी लागायचा त्याच ठिकाणी पेपर आहे, ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद , स्त्री विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen