बसमध्ये अवचित भेटणारे चित्रपट झोप येत नाही आणि जागेही राहवत नाही अशी अवस्था बसच्या प्रवासात असते. बाहेरच्या अंधारात पुसटशी दिसणारी पळती झाडे, बसमधील अंधार आणि बसच्या आवाजाची लय. अशा वेळी बसमध्ये अचानक आपला पहायचा राहून गेलेला एखादा चित्रपट लागतो अथवा आपल्याला पहायची अजिबात इच्छा नसलेला चित्रपट लागतो...आपल्यापुढे काही पर्यायच नसतो.. ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांची पण स्वतःची Sociology , इतिहास , भूगोल आणि अर्थशास्त्र असं बरच काही असत . मी जेंव्हा पुण्याला शिकायला आलो होतो , तेंव्हा प्रचंड होमसिक झालो होतो . वारंवार पुण्याहून परभणीला जायचो . त्याकाळात असंख्य वेळा ट्रॅव्हल्समधून प्रवास करावा लागला . त्याकाळात मनस्थिती मोठी विचित्र असायची . एक तर पुण्यासारख्या मोठ्या शहरात आपण कुणीच नाही , अशी ठुसठुसणारी भावना असायची . मुळातच कमी असलेला आत्मविश्वास अजूनच रसातळाला गेला होता . त्यात भर म्हणजे परभणीवरून पुण्याला जाताना घर सोडून जाण्याचं प्रचंड दुःख झालेलं असायचं . ट्रॅव्हल्समधले लाईट बंद झाले की मला अजूनच एकटं एकटं असण्याचं फिलिंग यायचं . ट्रॅव्हल्समध्ये दाखवले जाणारे सिनेमे हा या ठुसठूसत्या मनावर रामबाण उपाय आहे , असं काही प्रवासानंतर मला लक्षात आलं . त्यावेळेस आमच्या ट्रॅव्हल्समध्ये गोविंदा , मिथुन आणि बॉबी देओलच्या सिनेमाचा भडीमार असायचा . मला लक्षात आलं की हे सिनेमे बघताना काहीवेळापुरता का होईना आपल्या चिंता गायब होतात . त्यावेळेस गोविंदाचा 'दुल्हेराजा ' प्रदर्शित झाला होता .तो सिनेमा हमखास ट्रॅव्हल्समध्ये लागायचा .तो सिनेमा मी ट्रॅव्हल्समध्ये मोजून २३ वेळा पाहिला होता . प्रत्येकवेळेस मी तितकाच खिदळत तो सिनेमा बघितला होता . मला आज पण तो सि ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .