चित्रस्मृती आप की कसम-- वादळी विषय, संयत हाताळणी 


चित्रस्मृती आप की कसम-- वादळी विषय, संयत हाताळणी दिग्दर्शकाची प्रवृत्ती/प्रकृतीचा प्रभाव त्याच्या कलाकृतीवर पडणे/असणे अगदी स्वाभाविक आहे. 'आप की कसम ' ( १९७४) हा चित्रपटही असाच. प्रेम विवाहाच्या सुखाच्या संसारात ( राजेश खन्ना व मुमताज) पतीला संशय येतो की तिचे आणखीन कोणाशी तरी ( संजीवकुमार) विवाहबाह्यसंबंध आहेत. तो प्रचंड गैरसमजात राहतो आणि त्याचा हा बळावलेला संशय सहन न झाल्याने पत्नी त्याच्यापासून दूर जाण्याचा ठाम निर्णय घेते.... तब्बल पंचेचाळीस वर्षांपूर्वी व्यावसायिक चित्रपटात असा विषय क्वचितच येई आणि तीदेखिल निर्माते जे. ओम प्रकाश यांनी दिग्दर्शन पदार्पणातच असा विषय हाताळला. ते करताना त्यांनी चित्रपटाची मनोरंजनाची चौकट सांभाळत गीत संगीत व नृत्य यांच्या जोडीने हा विषय पडद्यावर आणला आणि यश मिळवले. दक्षिण मुंबईतील नाझ चित्रपटगृहात या चित्रपटाने ज्युबिली यश संपादले. चित्रपटाचे जग अनेक प्रकारच्या गोष्टींनी भरलयं आणि त्याचा प्रत्यय कधी, कसा, कुठे येईल हे सांगता येणार नाही. निर्माता आणि दिग्दर्शक जे. ओम प्रकाशही अगदी तसेच. खरं तर दशकभरापूर्वीच त्यांनी चित्रपट निर्मिती थांबवली, आपला नातू ह्रतिक रोशनच्या यशस्वी वाटचालीला सदिच्छा देण्याचा आनंद ते घेऊ लागले. पण अशातच त्यांची तब्येत वाढत्या वयानुसार ढासळत होती, शरीर दमले होते, बोलणे अस्पष्ट होत होते, पण तरीही त्यांनी जुहू येथील आपल्या निवासस्थानापासून ओशिवरा येथील आपल्या फिल्म युगच्या  कार्यालयात येणे थांबवले नाही. वयाच्या चक्क नव्वदीपारही ते अगदी दररोज किमान एक तास तरी येत, आपल्या कार्यालयात आपल्या अनेक चित्रपटांच्या ट्राॅफीज, लोकप्रिय संगीताच्या गोल्डन डिस्क, कॅमेरासोबतचा आपला भव्य फोटो यांच्या सहवासात तासभर शा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen