अमृता सुभाष सॅक्रेड गेम्समध्ये वैचारिक बैठक असलेल्या, उत्तम वाचन असलेल्या आणि सौंदर्य-अभिनय यांची नेमकी सांगड ज्यांच्या व्यक्तिमत्वात दिसते अशा मराठी अभिनेत्रींमध्ये अमृता सुभाषचे नाव पहिल्या फळीत आहे. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी आणि पार्श्वगायन अशा चारही क्षेत्रात अमृताची कामगिरी लक्षणीय आहे आणि ती उत्तम लेखिकासुद्धा आहे. एवढे असूनही ती कायम लो प्रोफाइल असते, जमिनीवर असते. चांगल्याला चांगले म्हणण्याची दिलदारी आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा स्पष्टवक्तेपणाही तिच्याकडे आहे. त्यामुळेच तिच्या कारकीर्दीत ती हळूहळू परंतु निश्चित दिशेने वाटचाल करत आली आहे. ‘गली बॉय’ हा तिच्या कारकीर्दीतला एक माइल स्टोन होता तर ‘सॅक्रेड गेम्स’मधील तिच्या प्रवेशाने तिच्यातील अभिनेत्रीसाठी शक्यतेची शेकडो दारे उघडून दिली आहेत. अमृताने सिनेमॅजिकच्या वाचकांना सॅक्रेड गेम्स पाहण्याचे आव्हान केले आहे. ते पाहातानाच तिला आपण शुभेच्छाही देऊ या- [videopress UIrx2PRp] ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Dhananjay P Bhosale
6 वर्षांपूर्वीThanks