जाऊ कहा बता ऐ दिल: निहिलीझमच्या म्हशीला टोणगा!


नीतिशास्त्रासोबतच नैतिकतेची बंधनं सुद्धा ही विचारधारा मानत नाही. मात्र ही विचारधारा बाळगणारे सामान्यांपेक्षा अधिक प्रामाणिक, स्पष्ट आहेत असा समज त्यांचा आणि इतरांचा असतो! हा समज आहे कि गैरसमज हे सिनेमा कळत-नकळत पडताळून पाहतो! आशावाद आपल्याला वाटतो तितका बाळबोध नाही हे सत्यही इथे शोधता येतं.

जाऊ कहा बता ऐ दिल: निहिलीझमच्या म्हशीला टोणगा!

दोन पात्र; एक स्त्री एक पुरुष. त्यांच्या आयुष्यातला एक दिवस, आणि रात्र. त्यांचा एकमेकांशी सतत चाललेला संवाद आणि वाद, कधी भावनिक, कधी शारिरीक, तर कधी मानसिक. ते कशा विषयी बोलतात? बोलताना कुठली भाषा वापरतात? शिव्या वापरतात? यात आपण सृरुवातीला बरेच गुंतत राहतो. हळुहळू आपण या पलीकडे जाऊन या दोघांच्या आत्म्याला समजू लागतो, तेव्हा खरी गंमत सुरु होते, किंवा संपते! आदिश केळुसकर दिग्दर्शित ‘जाऊ कहा बता ऐ दिल’ अलीकडे हिंदीत बनलेल्या अनेक ‘ईंडी’ सिनेमांमध्ये आपली विशेष ओळख टिकवून राहील अशी लक्षणं आहेत. सिनेमा ‘ईंडी’ असण्याला आपली मर्यादा न मानता आपली ताकद मानतो आणि सर्वत्र ती कशी उधळता येईल याचे भान ठेवतो! संवादातल्या आणि वादातल्या मुक्तपणाचे उगम इथूनचं आहे! कुठल्याही होतकरू सिनेमाकारासाठी प्रथमतः हा सिनेमा या मुक्तपणासाठीच प्रेरणादायी ठरेल. सिनेमा रचनेच्या दृष्टीने पाहताही परिपूर्ण ‘सिनेमा’ वाटतो. संवादात मुक्तपणा असला तरी दोन्ही पात्रांच्या एकमेकांशी असलेल्या गृहीतकाचा आलेख आपल्यासमोर पुरेपूर खुलू दिला आहे. यातून एक स्थिर अ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen