विदर्भातील ‘मारबत’ परंपरा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात


विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजले जाणाऱ्या मारबत परंपरेची दखल मराठी चित्रपटसृष्टीने घेतली आहे. राजकुमार मेंडा निर्मित आणि समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी ‘बकाल’ ह्या चित्रपटाची पार्श्वभूमी मारबत परंपरेच्या मूळ संकल्पनेशी जोडली आहे. त्याचबरोबर मारबत परंपरेला अनुसरून मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर देवीचा महिमा असलेले एक गाणेही चित्रीत करण्यात आले आहे.

विदर्भातील ‘मारबत’ परंपरा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात

मुंबई-पुण्यात जसा स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेच्या एकोप्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तसा नागपूरच्या भोसले घराण्याने १८८२ साली मारबत मिरवणुकीला प्रारंभ केला. काळी मारबत आणि पिवळी मारबत ह्या देवीच्या प्रतिकृती तयार करून त्यांची मिरवणुक नागपूरच्या महाल, इतवारी, मोमीनपुरा परीसरात फिरवल्या जातात आणि त्यांचे दहन केले जाते. समाजाती अनिष्ट प्रथा आणि प्रवृत्ती मारबत घेऊन जाते असे आवाहन केले जाते. काळ्या मारबतीला १३८ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३४ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघत असतात. ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजले जाणाऱ्या मारबत परंपरेची दखल मराठी चित्रपटसृष्टीने घेतली आहे. राजकुमार मेंडा निर्मित आणि समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी ‘बकाल’ ह्या चित्रपटाची प ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


समाजकारण , चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.