अदूर यांनी, या चित्रपटात विविध प्रयोग केले. राय आणि घटक यांचा प्रभाव त्यांच्यावर होताच. घटक तर त्यांचे FTIमधील शिक्षकच! परदेशी चित्रपट हे त्यांच्या सातत्याने पाहण्यात असत. अदुरचे हे प्रशिक्षण, त्यांची रंगकर्मी ही घडण आणि त्यांची वर्ल्ड सिनेमा ची जाण; या सर्व गोष्टी 'स्वयंवरम'मध्ये दिसून येतात. स्वयंवरम (१९७२)-अदूर गोपालकृष्णन 'स्वयंवर' ही प्राचीन काळातील सामुहिक वर संशोधनाची पद्धत. इथे, वधूची निवड महत्वाची मानली जायची. मात्र, संशोधन हे वडिलांनीच केलेले असे. अदूरच्या 'स्वयंवरम' मध्ये, तिचा शब्दशः अर्थ होतो. म्हणजे, वर ही तिनेच निवडलेला; संशोधन ही तिनेच केलेले. अर्थात, वर म्हणजे फक्त 'पुरुष' नव्हे; तर, तो ज्या परीस्थितीत असे, त्या परिस्थितीसह त्याची निवड! त्यामुळे, पालकांचा विरोध स्वाभाविक! सीता आणि विश्वम यांचे हे कुटुंब. घरच्यांनी नाकारलेले. त्यामुळे, स्वतःचा मार्ग शोधणारे. अगदी प्रारंभी, त्यांचे हे 'शोधणे' एक प्रदिर्घ अशा बस प्रवासातून येते. मग, सागर आणि जंगल यांच्या माध्यमातून त्यांचे बागडणे येते. नव्या नवलाईच्या दिवसात छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये राहणे होते. मात्र खिशाला चाट बसू लागल्यावर एका गावात छोट्या घरात ते राहू लागतात. वेश्या, स्मगलर, दारुडे असा विचित्र शेजार असतो. तर, शहरामध्ये, सारखे संप होत आहेत. नोकऱ्या मिळणं मुश्कील आहे. 'तेच, तेच जुनं कशाला? नवे छापायला हवं' अशी फक्त चर्चा करणारे दांभिक प्रकाशक आहेत. तिकडे, सुशिक्षित आणि लिहू पाहणाऱ्या विश्वनाथचे नोकरी शोधणे चालू आहे. इकडे सीतेचे संसार सांभाळणे! अडचणी आहेत; पण दोघातील प्रेम आणि समंजसपणा घट्ट आहे. दोघांना मूल होते. जबाबदारी वाढते. फार ऐश्वर्य नसते; तरी दृष्ट लागतेच! 'स्वयंव ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .