नर्गिस दारात ‘दत्त‘ म्हणून उभी !/ मनोहर सप्रे


नर्गिसच्या दत्तच्या मृत्यूनंतर किर्लोस्कर समूहाच्या ‘मनोहर’ मासिकानं तिच्यावर खास विशेषांक ( मे  १९८१ ) काढला होता. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचा त्या विशेषांकात प्रसिद्ध झालेला हा लेख. कितीही लोकप्रियता, यश मिळालं तरी समाजमान्यतेचा काटा मनात कसा रूतलेला असतो, हे या लेखात इतकं आपसूक येतं की आपणही अंतर्यामी थरारतो.. एखादी स्वप्नरेषा उमटावी तशी दारात नर्गिस दत्त म्हणून उभी होणं हा माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण ! पांढरी शुभ्र अरगंडी साडी, कोपरापर्यंत तसलाच ब्लाउज, कपाळी लालबुंद ठळक कुंकू नि चेहऱ्यावर परिचयाचा आभास निर्माण करणारं स्मित ! माझ्या तरुणपणी रुपेरी पडद्यावर पाहिलेलं तिचं तरुणपण तिच्या वर्तमान रूपात शोधण्याचा मी चोरटा प्रयत्न करतो. चेहऱ्यावरचं सूक्ष्म सुकलेपण व भांगाच्या जागी वाढत्या वयाच्या पाऊलखुणा दाखवणारी करड्या केसांची विखरण सोडल्यास ती अजूनही ‘तीच‘ असते !माझे हात नकळत नमस्कारासाठी जुळतात ! ती माझ्याकडे येते आहे हा निरोप येता क्षणी मी जाम गोंधळतो. माझ्यासारख्या व्यंगचित्रकाराकडे एक अव्यंग आपल्या पाउली चालत येणं हे एक अतर्क्य असतं. पण ती खरंच आलेली असते. काष्ठशिल्प हा मला थोडीफार प्रसिद्धी मिळवून देणारा माझा एक छंद ! तिचं येणं या संदर्भात हे तिच्याच तोंडून कळालं. त्याचाच भाग म्हणून मला मुंबईला येण्याचं आग्रही आमंत्रण दिलं. वज्रेश्वरीच्या मुक्तानंदांच्या आश्रमात विश्वस्त म्हणून तिला एक बंगली मिळालेली असते तिथे रस्टिक पद्धतीची विरक्त सजावट मी करावी ही तिची इच्छा दिसली. वज्रेश्वरीच्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , व्यक्ती विशेष , चित्रपट जगत

प्रतिक्रिया

  1. ugaonkar

      6 वर्षांपूर्वी

    याबाद्दल मला दोन तीन विचार सुचतात १) प्रथम सप्रे नावाचा एक मराठी माणूस नर्गिस म्याडम च्या इतक्या जवळ जाऊ शकला होता ! २) प्रसिद्धी आणि पैसा याच्या शिखरावर गेलेल्या व्यक्तीला कशा प्रकारचे दुःख असते ! ३) पुढे जाऊन मुलाने आईची काळजी कशी खरी होती हे सिद्द केले. किंवा चिरंजीव त्यावेळीस सुद्दा असेच गन्जडी होते ते त्या मातेला माहित होते.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen