२०१७ मधे स्टीवन किंगच्या १९८६ मधे लिहिलेल्या आणि त्याच्या साहित्यातल्या सर्वात महत्वाच्या पुस्तकांमधली एक मानली जाणाऱ्या कादंबरीवर सिनेमा आला तेव्हा चाहते जरा काळजीतच होते. एकतर ही कादंबरी हजार, जवळजवळ अकराशे पानांची. भयकथा हे त्याचं वरवरचं रुप असलं, तरी त्यापलीकडे अनेक गोष्टींना कवेत घेणारी. नॉस्टॅल्जिआ, अमेरिकन संस्कृती आणि समाज, सामाजिक अन्याय, वर्णद्वेष, लहान मुलांचं विश्व आणि त्यात होणारे बदल, भूतकाळचं सावट, अशा अनेक थीम्स त्यात विणलेल्या.इट : चॅप्टर टू - परिणामातही दुय्यम
- गणेश मतकरी २०१७ मधे स्टीवन किंगच्या १९८६ मधे लिहिलेल्या आणि त्याच्या साहित्यातल्या सर्वात महत्वाच्या पुस्तकांमधली एक मानली जाणाऱ्या कादंबरीवर सिनेमा आला तेव्हा चाहते जरा काळजीतच होते. एकतर ही कादंबरी हजार, जवळजवळ अकराशे पानांची. भयकथा हे त्याचं वरवरचं रुप असलं, तरी त्यापलीकडे अनेक गोष्टींना कवेत घेणारी. नॉस्टॅल्जिआ, अमेरिकन संस्कृती आणि समाज, सामाजिक अन्याय, वर्णद्वेष, लहान मुलांचं विश्व आणि त्यात होणारे बदल, भूतकाळचं सावट, अशा अनेक थीम्स त्यात विणलेल्या. त्याची रचनाही विशेष. इट कादंबरीचा प्रमुख कथाभाग आहे तो दोन काळात विभागलेला. पहिला काळ १९५७/५८ तर दुसरा १९८४/८५. १९५७ च्या कथानकात काही मुलांचा सामना डेरी या गावात आलेल्या पेनीवाईज हे नाव लावणाऱ्या भयकारक अमानवी अस्तित्वाशी होतो. ही मुलं शपथ घेतात, की त्याचा नायनाट झाला नसेल तर तो करण्यासाठी आपण जिथे कुठे असू तिथून डेरीमधे परत येऊ. ही शपथ ते कशी पूर्ण करतात ते दुसऱ्या काळातल्या कथानकात येतं. कादंबरीत मुलांची गोष्ट आणि मोठ्यांची गोष्ट ही समांतर घडते. त्यामुळे आपण आलटून पालटून दोन्ही काळात डोकावत ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
akashvthele
6 वर्षांपूर्वीपण जर पुस्तक वाचले नसेल तरी चित्रपट बघण्यात काही फरक पडेल काय? की हे फक्त पुस्तक वाचलं असल्यामुळे जाणवलं असाव!
shripad
6 वर्षांपूर्वीहे एक माझे आवडते पुस्तक आहे पण शायनिंग चा (आणि काही प्रमाणात शॉशँक रेडेम्पशन चा) अपवाद वगळता चित्रपट स्टीफन किंग च्या कथेशी न्याय देऊ शकले नाहीयेत. या (इट) कथेवरच आधारित धारपांची एक कादंबरी आहे, शपथ नावाची, ती ही वाचनीय आहे.