लता सार्वभौम होती त्या पन्नास ते साठ या हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णदशकाच्या कालखंडात आशा अस्तित्वात अवश्य होती, पण ती नंतर झाली तशी राज्यकर्ती नव्हती. तिला आपला बालेकिल्ला पूर्णपणे गवसला नव्हता. ती शब्द चावून म्हणायची. आवाजात थोडी कृत्रिमता व चोरटेपणा होता. शब्दांची फेक तोकडी पडायची. आवाज गुदमरतोय व मोकळा व्हायला धडपडतोय अशी ऐकताना भावना व्हायची. आत्मविश्वासाचा अभाव हेच याचं संभाव्य कारण दिसतं.दुसरी महाराणी
- शिरीष कणेकर ‘लता म्हणजे ब्रॅडमन, आशा म्हणजे सोबर्स. अष्टपैलू.’ इति आर. डी. बर्मन. ‘जगात दोनच भोसले झाले. एक शिवाजीराव आणि दुसरी आशा भोसले. बाकीचे नुसतेच बाबासाहेब भोसले.’ इति मी. ‘मला आयुष्यभर एक सल आहे. मी कायम ‘नंबर टू’ राहिले.’ इति आशा भोसले. ‘आमची आशा भन्नाट गाते. मला सगळ्यात आवडणारं तिचं गाणं म्हणजे रोशनचं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ इति लता मंगेशकर. मी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर व परदेशात इतक्या लोकांशी बोलल्यावर माझं असं इम्प्रेशन झालंय आणि ते चुकीचं नाही की आशा लतापेक्षा काकणभर जास्तच लाडकी आहे, पण कमी नाही. हे आशालाही माहित्येय, पण तिच्या हातातला केशरी दुधाचा प्याला ओठांपर्यंत जाईपर्यंत त्यात मिठाचा खडा पडतोच. तो अहेतुकपणे टाकणारी कोण तर सख्खी थोरली बहीण. तिनं काय केलं? काही नाही, फक्त गायली, गायली आणि गायली. लता आधी आली, मोठी झाली व मोठीच राहिली. आम्ही कानसेनांनी स्वेच्छेनं तिची गुलामी पत्करली. आशा हतबुद्ध झाली आणि तरीही दिमाखदार चौकार आणि षटकार मारत राहिली. हार मानणं तिच्या रक्तातच नव्हतं. मास्टर दीनानाथांचं रक्त. तेच थोरलीत होतं, तेच धाकटीत ह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
manisha.kale
6 वर्षांपूर्वीApratim.
Meenalogale
6 वर्षांपूर्वीखूप छान लेख आहे.अजून विस्तृत वाचायला आवडला असता .